पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांची भाषणशैली आणि बोलण्याची पद्धत याची नक्कल करत राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. इतकंच नाही तर महापालिका निवडणुका (Municipal Election) पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर घेण्यात आला. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.