Raj Thackeray : शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे आज रुग्णालयात दाखल होणार, दोन महिने आराम करावा लागणार

राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याला युपीतील खासदारांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी युपीच्या लोकांची माफी मागावी अशी त्यांची मागणी होती.

Raj Thackeray : शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे आज रुग्णालयात दाखल होणार, दोन महिने आराम करावा लागणार
शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे आज रुग्णालयात दाखल होणार
Image Credit source: twitter
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 18, 2022 | 2:09 PM

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे चर्चेत आहे. राज ठाकरे यांच्या पायावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने ते आज लीलावती रूग्णालयात (Lilavati Hospital)  काही चाचण्या करण्यासाठी दाखल होणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. शस्त्रक्रिया ही एक जूनला होणार होती. परंतु राज ठाकरे यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याने त्यांच्या पायावरील शस्त्रक्रिया डॉक्टरांनी पुढे ढकलली होती. उद्या त्यांच्या पायावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

अयोध्या दौरा लांबणीवर टाकला

राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याला युपीतील खासदारांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी युपीच्या लोकांची माफी मागावी अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर पुण्यात एका सभेत राज ठाकरेंनी माझी एक छोटीसी शस्त्रक्रिया करायची आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा लांबणीवर टाकला आहे. आज ते रूग्णालयात दाखल होणार आहेत.  तर पुढच्या काही दिवसात त्यांच्या पायावरती शस्त्रक्रिया होईल. पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज ठाकरे यांना साधारण दोन महिने आराम करावा लागणार आहे.

शस्त्रक्रियेबाबत मुद्दाम सांगितलं होतं

पुण्यातील एका जाहीर सभेत राज ठाकरेंनी शस्त्रक्रियेविषयी सांगितलं होत. तसेच त्यावेळी त्यांनी पायाची शस्त्रक्रिया करायची असून ती छोटीशी शस्त्रक्रिया आहे असंही सांगितलं होत. त्यानंतर त्यांनी त्यांनी हेही सांगितलं की मी हे मुद्दाम सांगतोय. कारण पत्रकार म्हणतील नेमका कोणता अवयव काढला असा टोला देखील राज ठाकरेंनी लगावला. त्यानंतर उपस्थित सभेत मोठा हशा पिकला होता.

काळजी घेण्याचा सल्ला

माझे वजन 35 होते. तोपर्यंत माझं वजन 63 होतं. पण त्यानंतर वजन वाढायला लागलं. आपल्या आरोग्या संदर्भातल्या पथ्यपाणी खूप सिरियस घ्यायल्या हव्यात. आपण नेहमी या गोष्टीकडे टाळाटाळ करतो. त्यामुळेचं मला सध्याचा त्रास होतं आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्यायला हवी असं राज ठाकरे यांनी उपस्थितांना त्यावेळी सल्ला दिला होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें