AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे आज मोठी घोषणा करणार?

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे. राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पत्रक मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. असं असलं तरी मनसे लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं औत्सुक्याचं […]

राज ठाकरे आज मोठी घोषणा करणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे. राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पत्रक मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. असं असलं तरी मनसे लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मनसेची भूमिका जाहीर करण्यासाठी पदाधिकारी मेळावा घेण्यात येत आहे. यात जो आदेश राज ठाकरे देतील तो मान्य असेल असं मनसैनिकांचं म्हणणं आहे.

त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे काय भूमिका घेणार?

दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे कोणाला पाठिंबा देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढली आहे. त्यामुळे मनसे राष्ट्रवादी काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मनसेच्या माघारीने शिवसेना, राष्ट्रवादीच्या गालावर खळी, मतं खेचण्याचा प्रयत्न 

दुसरीकडे मनसेची मतं ही शिवसेनेचीच आहेत, त्यामुळे मनसेला शिवसेना हा पर्याय असल्याचा दावा शिवसेना नेते करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मनसेने नुकतंच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला. पक्षाच्या 13 वर्षांच्या वाटचालीनंतर अधिकाधिक जागा लढवण्याऐवजी निवडणुकीतूनच माघार घेत असल्याने मनसेच्या ताकदीबाबत अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक न लढण्यामागची राज ठाकरेंची रणनिती आज कळू शकेल.

संबंधित बातम्या  

मनसेच्या माघारीने शिवसेना, राष्ट्रवादीच्या गालावर खळी, मतं खेचण्याचा प्रयत्न

राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देणार?

मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही!   

अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार  

राज ठाकरे आघाडीत या, अजित पवारांची हाक

Follow Us
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर