अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार

मुंबई: आघाडीत येण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाक दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबईत ही गुप्त बैठक होणार असल्याची माहिती आहे. या दोघांमध्ये लोकसभा जागा वाटपावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक इथल्या जागांची मागणी केल्याची माहिती यापूर्वीच आली होती. मात्र […]

अजित पवार राज ठाकरेंची भेट घेणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई: आघाडीत येण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाक दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुंबईत ही गुप्त बैठक होणार असल्याची माहिती आहे. या दोघांमध्ये लोकसभा जागा वाटपावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक इथल्या जागांची मागणी केल्याची माहिती यापूर्वीच आली होती. मात्र त्याबाबत स्पष्टता नव्हती. अजित पवार यांनी काल टीव्ही 9 मराठीशी बोलताना मनसेने समविचारी पक्ष म्हणून आघाडीसोबत यावं, असं जाहीर आवाहन केलं होतं. त्यानंतर आता अजित पवार हे थेट राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

जर मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत आली तर आघाडीची ताकद आणखी मजबूत होणार हे निश्चित आहे.

अजित पवार काल काय म्हणाले होते?

“मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आलं पाहिजे. मनसेने गेल्यावेळी एक लाख मतं घेतली होती. माझं वैयक्तिक मत आहे की एकत्र आले पाहिजे” असं अजित पवार म्हणाले.

वाचा: राज ठाकरे आघाडीत या, अजित पवारांची हाक 

शरद पवार-राज जवळीक

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीच्या गोटात सामील होऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या कोट्यातून मनसेला देण्याबाबत चर्चाही सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनसेला आघाडीच्या कोट्यातून मुंबईत लोकसभेसाठी एक जागा देण्याची चर्चा आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा मनसेला द्यावी आणि इतर ठिकाणी त्यांची मदत घ्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला होता. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला होता.

मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध का?

उत्तर भारतीयांचा कट्टर विरोधक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसला देशातील हिंदी पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमधील जनतेच्या रोषाला काँग्रेसला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

संबंधित बातम्या 

राज ठाकरे आघाडीत या, अजित पवारांची हाक 

महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?  

राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न 

ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान  

लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…  

राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.