Amit Thackeray | अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

Amit Thackeray | अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
Amit Thackeray

अमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत आहे. खबरदारी म्हणून ते रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली

अनिश बेंद्रे

|

Oct 19, 2020 | 11:14 AM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. अमित ठाकरे यांना ताप आल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Raj Thackeray’s son Amit Thackeray admitted to Leelavati Hospital)

अमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत आहे. खबरदारी म्हणून ते रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याशिवाय त्यांची मलेरिया टेस्ट करण्यात आली, ती सुद्धा निगेटिव्ह आली.

अमित ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ग्राऊंडवर उतरुन अॅक्टिव्हपणे कामं करत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत, डॉक्टरांचे प्रश्न अशा विविध कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.

काही दिवसापू्र्वी अमित ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला होता. आरे कारशेड कांजुरमार्गला हलवल्याने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

आरेतील झाडे वाचवण्यासाठी अमित ठाकरे उतरले होते मैदानात

मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, अशी भूमिका त्यावेळी अमित ठाकरे यांनी घेतली होती.

संबंधित बातम्या :

‘आरे’च्या लढ्याला यश; अमित ठाकरेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

(Raj Thackeray’s son Amit Thackeray admitted to Leelavati Hospital)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें