“ईडीची पीडा मागे लावणाऱ्यांना शपथविधीचं आमंत्रण, मात्र सत्तेच्या खुर्चीवर बसवणारे घटकपक्ष बेदखल”

शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळविस्तारासाठी घटकपक्षांना आमंत्रण न दिल्याने थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे (Raju Shetti on No invitation for Swearing Ceremony ).

"ईडीची पीडा मागे लावणाऱ्यांना शपथविधीचं आमंत्रण, मात्र सत्तेच्या खुर्चीवर बसवणारे घटकपक्ष बेदखल"

मुंबई : शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळविस्तारासाठी घटकपक्षांना आमंत्रण न दिल्याने थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे (Raju Shetti on No invitation for Swearing Ceremony ). यावेळी राजू शेट्टी यांनी या अपमानाची किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा शरद पवार आणि महाविकासआघाडीला दिला आहे. याबाबत ट्विट करत राजू शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राजू शेट्टी म्हणाले, “ज्यांनी ईडी, इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण दिलं. मात्र, ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले त्या सर्व घटकपक्षांना शपथविधीला बेदखल करण्यात आलं.”

आपल्या ट्विटच्या शेवटी त्यांनी व्वा जाणते राजे असा हॅशटॅग वापरत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. इनकम टॅक्स, ईडी पीडा मागे लावणाऱ्याना सन्मानाने बोलवलं, मात्र सत्तेच्या खुर्चीवर बसवणाऱ्या मित्रपक्षांना आमंत्रण दिलं नाही. याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल, असं म्हणत राजू शेट्टी यांनी महाविकासआघाडीला इशाराही दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आघाडीतील घटकपक्षांची नाराजी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यावर आघाडीतील नेते काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Published On - 5:52 pm, Mon, 30 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI