AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचीही चाहूल दिसायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी महत्त्वाच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे आणि राजू शेट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत काय […]

राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 28, 2019 | 1:48 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचीही चाहूल दिसायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी महत्त्वाच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे आणि राजू शेट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतही राजू शेट्टींच्या मतदारसंघात सभा घेत मोदी-शाह यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. तसेच याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला झाला, तरी होऊ द्या असे आवाहन केले होते.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभा केला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. त्यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विधानसभेसाठी बोलणी झाल्याचेही बोलले गेले. मात्र, यानंतरही लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचाराला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, अशी टीका झाली. त्यामुळे आता राज ठाकरे देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आपली रणनीती ठरवत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी काय चर्चा केली हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

देशपातळीवर विरोधकांना एकत्रित आणून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची कोंडी करण्याची एकही संधी राज ठाकरेंनी सोडलेली नाही. त्यामुळे ही खेळीही महायुतीला अडचणीत आणण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूनं याठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करुन प्रचार करण्यात आला होता. या मतदारसंघात सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांचाही संघर्ष पाहायला मिळाला. या ठिकाणी आघाडी आणि युतीच्या सभा तर झाल्याच, सोबत राज ठाकरे यांनीही इचलकरंजीमध्ये मनसेची जाहीर सभा घेतली. यासभेमधून राज ठाकरे यांनी थेट मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळणार की काही वेगळी राजकीय समिकरणे तयार होणार हे लवकरच स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...