AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election : आमदारांना सफारी गाडीची ऑफर, उस्मानाबादचे निटूरे करणार उमेदवारी दाखल

निटूरे यांनी त्यांच्या या ऑफरबाबत फेसबुक व इतर माध्यमातून पोस्ट केली आहे. त्यांच्या या ऑफरला कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होईल. निटूरे यांनी यापूर्वी वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविली होती.

Rajya Sabha Election : आमदारांना सफारी गाडीची ऑफर, उस्मानाबादचे निटूरे करणार उमेदवारी दाखल
राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 11:11 PM
Share

उस्मानाबाद : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha elections) होतेय. भाजपच्या तीनही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. तर राज्यात शिवसेना दोन, राष्ट्रवादी एक काँग्रेस एक असे तीन उमेदवार आहेत. त्यातच आता भाजपने आपला चौथा उमेदवार दिला आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच व घोडेबाजार जोरात सुरु असताना उस्मानाबाद येथील एका राजकीय नेत्याने आमदारांना सफारी (Safari) गाडीची ऑफर दिली आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे हे उद्या 31 मे रोजी मुंबई विधानभवन (Vidhan Bhavan) येथे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

RajyaSabhaelections

राज्यसभा निवडणूक

ऑफरबाबत फेसबुक व इतर माध्यमातून पोस्ट

राज्यसभा निवडणुकीत निटूरे यांना आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देणार असल्याची त्यांची घोषणा आहे. निटूरे यांनी 45 सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा घेतले असून प्रती गाडी 26 लाखप्रमाणे 11 कोटी 81 लाख खर्च रूपये ते खर्च करणार आहेत. निटूरे यांनी त्यांच्या या ऑफरबाबत फेसबुक व इतर माध्यमातून पोस्ट केली आहे. त्यांच्या या ऑफरला कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होईल. निटूरे यांनी यापूर्वी वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविली होती.

इतर पक्षांनी दिले उमेदवार

भाजपकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पियूष गोयल यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेकडून संजय पवार, संजय राऊत यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा जात असून ती प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आली आहे. तर काँग्रेसने राज्यातील चेहऱ्याला संधी न देता उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते आणि ऊर्दू शायर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इम्रान प्रतापगडी यांना संधी दिली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.