AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SambhajiRaje Chatrapati : ‘शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींसोबत विश्वासघात केला’, छावा संघटना आणि मराठा समनव्यकांचा गंभीर आरोप

शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता मराठा समन्वयक आणि छावा संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींसोबत विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

SambhajiRaje Chatrapati : 'शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींसोबत विश्वासघात केला', छावा संघटना आणि मराठा समनव्यकांचा गंभीर आरोप
संभाजीराजे छत्रपतीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 8:07 PM
Share

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं आपला दुसरा उमेदवार जाहीर केलाय. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी शिवसेना प्रवेशाचा प्रस्ताव डावलल्यानंतर शिवसेनेनं कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तशी माहिती दिली आहे, मात्र अधिकृत घोषणा होणार असल्याचंही राऊत म्हणाले. शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता मराठा (Maratha) समन्वयक आणि छावा संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींसोबत विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच पवार साहेबांना आपल्यावर लागलेला विश्वासघातकीचा शिक्का पुसण्याची ही संधी असल्याचंही मराठा समन्वयक म्हणालेत.

मराठा समन्वयक, छावा संघटना आक्रमक

शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. तसंच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अशावेळी छावा संघटनेचे धनंजय जाधव, अंकुश कदम, विनोद साबळे, महेस डोंगरे, गंगाधर काळकुटे याच्यासह मराठा समाजातील तरुण ट्रायडंट हॉटेलसमोर पोहोचले. त्यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केलाय. ‘संभाजीराजेंनी दिल्ली मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या होत्या. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सांगितलं होतं की ते ही जागा कशा पद्धतीने लढत आहेत, यामध्ये मला तुमचं सहकार्य हवं. शरद पवार यांनी नांदेडमध्ये जाहीररित्या सांगितलं होतं की आम्ही आमची शिल्लक राहिलेली मतं संभाजीराजेंना देऊ. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडल्यानंतर चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, अनिल देसाई, अनिल परब असतील. त्याचबरोबर शिवसेनेचे वाचाळवीर संजय राऊत असतील. या सगळ्यांना माहिती होतं. याबाबत चर्चा खूप पुढे गेली होती. एक ड्राफ्ट ठरला होता. संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यात अडचण असेल तर त्यांना शिवसेना पुरस्कृत कसं करता येईल. या पद्धतीचा ड्राफ्ट एका मंत्र्याच्या बंगल्यात तयार झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आणि संभाजीराजेंची ट्रायडंट हॉटेलमध्ये चर्चा झाली होती. तिथे संभाजीराजेंना पुरस्कृत करण्याबाबत एकवाक्यता झाली. आजही वेळ गेलेली नाही. सन्माननीय पवार साहेबांवर लागलेला विश्वासघातकीचा डाग पुसण्याची ही संधी आहे. पवार साहेब, आणि उद्धव ठाकरेंनी छत्रपतींना दिलेला शब्द फिरवता कामा नये’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे, पवारांना इशारा

तसंच उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांना आवाहन आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ओपन टेबल मिटिंग घ्यावी. त्यांनी दिलेली आश्वासनं जर खोटी असतील तर आम्ही इथं थांबू. परंतु तुम्ही जी गद्दारी केली आहे हे पुराव्यानिशी, ड्राफ्ट घेऊन, फोटोग्राफ्स घेऊन तुमचा चेहरा उघड करणार, असा इशाराही मराठा समन्वयकांनी यावेळी दिलाय.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...