Ram Vilas Paswan | रामविलास पासवान : राजकीय हवेचा अंदाज अचूक ओळखणारा नेता

रामविलास पासवान यांनी 2000मध्ये लोकजनशक्ती पार्टीची स्थापना केली होती. आधी जनता पार्टी, जनता दल आणि नंतर जनता दल युनायटेडचे ते प्रमुख नेते होते.

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान : राजकीय हवेचा अंदाज अचूक ओळखणारा नेता
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 10:04 PM

पाटणा : लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान राजकारणाचा (Ram Vilas Paswan) अचूक अंदाज असणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. त्यांना राजकीय हवेचा अचूक अंदाज कळायचा. त्यामुळेच त्यांची राजकीय गणितं कधीच बिघडली नाहीत. उलट सतत सत्तेत राहून ते राजकारणात यशस्वी झाले (Ram Vilas Paswan).

रामविलास पासवान यांनी 2000मध्ये लोकजनशक्ती पार्टीची स्थापना केली होती. आधी जनता पार्टी, जनता दल आणि नंतर जनता दल युनायटेडचे ते प्रमुख नेते होते. मात्र, राजकारणाचं वारं फिरताच त्यांनीही स्वतंत्र पार्टीची स्थापना करून दलित राजकारणाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी 1981 मध्ये दलित सेना संघटनेची स्थापना केली होती. तर, सामाजिक न्यायाच्या हक्काबरोबरच दलितांवरील अत्याचारावर आवाज उठविण्यासाठी पासवान यांनी लोजपाची स्थापना केली. बिहारमध्ये दलितांची 17 टक्के मते आहेत. तर दुसाध जातीची मते 5 टक्के आहेत. लोजपाला बिहारच्या राजकारणात कोर व्होट बँकही मानलं जात असून दलितांचे नेते म्हणूनही त्यांची बिहारमध्ये ओळख आहे.

1969मध्ये अलौलीमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. शिवाय बिहारच्या आणि राष्ट्रीय राजकारणातून बाहेर फेकले जाणार नाही याची त्यांनी नेहमीच दक्षता घेतली. 1977मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवणारे पासवान त्यानंतर 9 वेळा लोकसभेवर निवडून गेले. सध्या ते नीतीश कुमार आणि भाजपच्या मदतीने राज्यसभेवर गेले होते (Ram Vilas Paswan).

अल्पपरिचय

  • 5 जुलै 1946मध्ये पासवान यांचा जन्म खगडिया जिल्ह्यातील एका गरीब दलित कुटुंबात झाला.
  • बुंदेलखंड यूनिव्हर्सिटी झाशीतून एमए आणि पटना विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षण घेतलं.
  • 1969मध्ये संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले.
  • 1977मध्ये सहाव्या लोकसभेवर जनता पार्टीच्या तिकीटावर ते निवडून गेले.
  • 1982मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते दुसऱ्यांदा विजयी झाले.
  • 1983मध्ये त्यांनी दलित सेनेची स्थापना केली.
  • 1989, 1996, 2000, 2004मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले.
  • 2000मध्ये त्यांनी जनता दल युनायटेडला सोडचिठ्ठी देऊन लोकजनशक्ती पार्टीची स्थापना केली.
  • 2009मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
  • 2010मध्ये ते बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले होते.

Ram Vilas Paswan

संबंधित बातम्या :

PHOTO | रामविलास पासवान: भारतीय राजकारणातील संघर्ष नायक!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.