“एकनाथ शिंदेंचा नातू मुख्यमंत्रीही होऊ शकतो”, रामदास कदमांनी रुद्रांश शिंदेच राजकीय भविष्य सांगितलं…

शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.सोबतच रुद्रांश श्रीकांत शिंदेचं भविष्यही सांगितलं आहे. पाहा...

एकनाथ शिंदेंचा नातू मुख्यमंत्रीही होऊ शकतो, रामदास कदमांनी रुद्रांश शिंदेच राजकीय भविष्य सांगितलं...
| Updated on: Oct 07, 2022 | 3:56 PM

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली. त्याचसोबत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे नातवावरही टीका केली. यावरून सध्या टीका टिपण्णी होत आहे. शिंदेगटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.सोबतच रुद्रांश श्रीकांत शिंदेचं भविष्यही सांगितलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या नातवाला नगरसेवक व्हायलाच आणखी 25 वर्षे लागतील. पण भविष्य कुणी पाहिलेलं नाही. तो भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो, असं रामदास कदम म्हणालेत.

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

एकनाथ शिंदे यांच्यावर तुमचा राग आहे, ठीक आहे. पण त्यांचा नातू फक्त दीड वर्षांचा आहे. तुम्ही दीड वर्षाच्या मुलावर पण बोलत आहात?, असं म्हणत कदम यांनी आपली खंत बोलून दाखवली.

उद्धव ठाकरे यांनी माझ्यासह एकनाथ शिंदे यांना राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोपही रामदास कदम यांनी केलाय.

लोकशाहीत आकड्याला महत्व आहे. ज्याचे आमदार, खासदार जास्त तो वरचढ ठरतो. शिवाजी पार्कमध्ये एक लाख लोक होते. तर बीकेसीला दोन लाख लोक होते. त्यामुळे परवाच्या दसरा मेळाव्यात कुणाची संख्या जास्त आहे ते दिसलंच आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, धनुष्यबाण 100% आम्हालाच मिळणार आहे. पण तरिही निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, असंही रामदास कदम म्हणाले आहेत.

आता उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे. तर आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची हिंदुत्वावादी शिवसेना आहे, असं रामदास कदम म्हणाले आहेत.