Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंना भाजपासोबत युती करायची होती; पण संजय राऊत…, रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे हे भाजपासोबत (BJP) युती करण्यास तयार झाले होते, मात्र तिथे संजय राऊत आले आणि सर्व फिस्कटलं असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंना भाजपासोबत युती करायची होती; पण संजय राऊत..., रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2022 | 5:09 PM

मुंबई :  संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद  घेतली. या पत्रकार परिषेदेतून त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर लगेचच रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.  यावेळी रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते, मात्र तिथे संजय राऊत आले आणि सर्व फिस्कटलं असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखील अटक झाली होती,  मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा  वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत. ते लढाई जिंकून येतील, असा विश्वास त्यांना वाटत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले कदम?

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेतून जे फुटले ते भाजपाचे गुलाम झाल्याची टीका  उद्धव ठाकरे यांनी केली होती. गुलाम कोण कोणाचं होतं हे बघा. तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात का याचा विचार केला पाहिजे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखील अटक झाली होती,  मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा  वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत. असं कदम यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार होते मात्र संजय राऊत तिथे आले आणि सर्व फिस्कटले असा गौप्यस्फोटही कदम यांनी केला आहे.

नड्डांच्या वक्तव्याशी सहमत नाही

दरम्यान शिवसेना हा पक्ष आता महाराष्ट्रातून संपला आहे, असं वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलं होतं. त्यावर देखील रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नड्डा यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदे गटात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.