Uddhav Thackeray : हिंदूमध्ये फूट पाडायची, मराठी-अमराठी भांडवायचे, उद्धव ठाकरेंनी राज्यपाल-नड्डाचं कनेक्शन जोडलं

आज शिवसेना (Shi vsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्त्यव्याचा देखील जोरदार समाचार घेतला आहे.

Uddhav Thackeray : हिंदूमध्ये फूट पाडायची, मराठी-अमराठी भांडवायचे, उद्धव ठाकरेंनी राज्यपाल-नड्डाचं कनेक्शन जोडलं
उद्धव ठाकरे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 4:13 PM

मुंबई :  आज शिवसेना (Shi vsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्त्यव्याचा देखील जोरदार समाचार घेतला आहे. प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला. प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात कोश्यारींच्या उद्गारातून झाली. मी याठीकाणी राज्यपाल हा शब्द मुद्दाम वापरत नाही. आज नड्डा म्हणाले पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची. हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची. राजकारणाच्या तुंबड्या भरायच्या हे भाजपचं कारस्थान भेसूर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तेव्हा देशाला अनुशासन पाहिजे त्यासाठी शिवसेनेने  आणीबाणीला  पाठिंबा दिला होता. तेव्हा त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, पुल देशपांडे दुर्गा भागवत साहित्यिक विचारवंत यांनी लोकशाहीच्या होमकुंडात उडी मारली होती. लोकशाही जिवंत ठेवली होती. राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर तुमचं ऐक्य अवलंबून नसतं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जनतेनेही एकत्र आलं पाहिजे. असे आवाहनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

‘दडपशाहीचे राजकारण’

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपाकडून दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी हिटलरचे उदाहारण दिले,  दुसऱ्या महायुद्धात हिटलर जिंकेल असं वाटत होतं. त्यावेळी डेव्हिड लो व्यंगचित्र काढायचा या व्यंगचित्रांमुळे हिटलर नामोहर झाला होता. हा माणूस कोण आहे, त्याला घेऊन या असे आदेशच हिटलरने तेव्हा दिले होते.  तेच आज देशात चाललंय आहे. जरा कोण बोललं तर त्याला दमदाटी केली जात आहे. बऱ्याबोलाने किंवा लोभाने आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. ही अटक आणि सर्व गोष्टी पाहिल्यावर मला गडकरींसारखं वाटत आहे. राजकारण सोडायचं नाही. पण राजकारणाची घृणा वाटत असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय म्हटलं होतं राज्यपालांनी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका राजस्थानी समाजाच्या मेळाव्यात बोलताना जर मुंबईमधील राजस्थानी आणि गुजराती माणसं चालली गेली तर मुंबई आणि परिसरात पैसा उरणार नसल्याचे वक्तव्य केलं होतं, तसेच आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहे, ती देखील पुसरली जाईल असे राज्यपालांनी म्हटले होते. त्यानंतर या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.