AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : राणा दाम्पत्यानं अभिवादन केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण, अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा

इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे.

Navneet Rana : राणा दाम्पत्यानं अभिवादन केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण, अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा
नवनीत राणा, खासदारImage Credit source: tv9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: May 29, 2022 | 8:51 AM
Share

अमरावती :  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) दाम्पत्याने काल अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. याच ठिकाणी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते  सकाळी 11 वाजता शुद्धीकरण करणार आहे. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने संविधान म्हणून दाखवावे, अशी मागणी भीम ब्रिगेडने केली होती. काल बऱ्याच दिवसांनी राणा दाम्पत्य दिल्लीतून नागपुरात दाखल झाले. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि त्यानंतर झालेली जेल, हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा यांनी दिल्ली गाठत राज्य सरकार आणि पोलिसांची संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर हेच राणा दाम्पत्य संजय राऊत यांच्यासोबत लडाख दौऱ्यादरम्यान दिसून आले. त्यानंतर ते काल नागपुरात आले. यावेळी नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘जय हनुमान, जय संविधान, जय श्रीरामच्या’ घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणाणून सोडलं. दरम्यान, इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांवर राणांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकदा तरी हनुमान चालिसा म्हणावी, किमान दिखावा म्हणून तरी हनुमान चालिसा म्हणावी, असा टोलाही राणा यांनी काल लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत. रामाचं आणि हनुमानाचं नाव घेईल त्यांना जेलमध्ये टाकण्याचा एकसूत्री कार्यक्रम त्यांनी राबवला आहे. उद्धव ठाकरे रूपी संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. विदर्भात अडीचं वर्षात पाऊल ठेवलेलं नाही, असा आरोप रवी राणा यांनी यावेळी केला तर महाराष्ट्रातील हनुमान चालिसेला विरोध का? असा सवाल नवनीत राणा यांनी केलाय.

आजही पोलिसांनी आम्हाला अडवलं

यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, मंदिरात आम्ही दर्शनासाठी आलो आहे. खुप दिवसांनी आम्ही विदर्भात पाऊल ठेवले. मात्र, पोलिसांनी आम्हाला आडवले होते. तरी आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत. मी हनुमानाला साकडे घातले की राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यायला हवे, बोरोजगार तरूणाना रोजगार मिळावा, राज्याला लागलेला शनी लवकरात लवकर दूर व्हावा यासाठी मी प्रार्थना केली, असेही त्या म्हणाल्या.

शिवसेनेची बॅनरबाजी

हनुमान चालिसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्य काल 36 दिवसानंतर अमरावती जिल्ह्यात आलं होतं. राणा दाम्पत्याचे स्वागत युवा स्वाभिमान समर्थकांनी केलं, दरम्यान, यावेळी बॅनरबाजी दिसून आली.

Follow Us
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!