Ratnagiri ZP : काका पुतण्यामध्ये चढाओढ, कोण होणार रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष?

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काका आणि पुतण्यामध्ये पदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. विक्रांत जाधव त्यांचे काका बाळ जाधव यांच्यामध्ये चढाओढ पाहायला मिळतीय. | Ratnagiri ZP Chairman

Ratnagiri ZP : काका पुतण्यामध्ये चढाओढ, कोण होणार रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष?
Ratnagiri ZP
| Updated on: Mar 09, 2021 | 9:26 AM

रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषद (Ratnagiri ZP) अध्यक्ष पदाची निवडणुक रंगतदार अवस्थेत आलीय. कारण आता इथं काका आणि पुतण्यामध्ये पदासाठी चुरस पहायला मिळणार आहे. कारण भास्कर जाधवांचे चिरंजीव विक्रांत जाधव या पदासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. (Ratnagiri ZP Chairman Candidature to Bhaskar Jadhav son Vikrant Jadhav And bal jadhav)

काका पुतण्यामध्ये चढाओढ, कुणासाठी कुणाची फिल्डिंग?

भास्कर जाधवांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला तरी चिरंजीव अजून राष्ट्रवादीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिरंजीवाचे नाव चर्चेत आहे. भास्कर जाधव यांनी मुलासाठी फिल्डिंग सुरु केली आहे. तर इकडे बाळाशेठ जाधव यांच्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी फिल्डिंग लावली आहे. दुसरीकडे पालकमंत्री असलेले उदय सामंत हे मातोश्रीवर कुणाच्या नावाची शिफारस करतात, हे पाहणे सर्वाधिक महत्त्वाचं आहे.

जि.प. अध्यक्षपद निवडणूक 22 मार्चला

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड येत्या 22 मार्चला होणार आहे. सव्वा सव्वा वर्षांसाठी शिवसेनेने ही सर्व पदं वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.

विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद कसं द्यावं?

मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांचे नाव चर्चेत आहे. पण विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना कशी संधी देता येईल, यावर सेनेत खलबतं सुरु आहेत.

भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

हे ही वाचा :

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी

भास्कर जाधवांच्या नाराजीचे पडसाद रत्नागिरी झेडपी अध्यक्ष निवडणुकीत?