AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न

मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. (Bhaskar Jadhav son Vikrant Jadhav)

भास्कर जाधवांच्या 'राष्ट्रवादी'वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न
भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 06, 2021 | 12:54 PM
Share

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड दोन आठवड्यात होणार आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिरंजीवाचे नावही चर्चेत आहे. मात्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना संधी कशी देता येईल, याविषयी शिवसेनेत खलबतं सुरु आहेत. (Shivsena confused how to give Ratnagiri ZP Chairman Candidature to Bhaskar Jadhav son Vikrant Jadhav)

अध्यक्षांना मुदतवाढ नाहीच

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड येत्या 22 मार्चला होणार आहे. सव्वा सव्वा वर्षांसाठी शिवसेनेने ही सर्व पदं वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.

पंचायत सभापतींची निवडही 16 मार्चला होणार आहे. रत्नागिरी, लांजा, खेड, राजापूर आणि खेड पंचायत समितीच्या सभापतींनीही राजीनामे दिले होते. सर्वांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. त्यामुळे आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

ZP अध्यक्षपद कसं द्यावं?

मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांचे नावही चर्चेत आहे. पण विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना कशी संधी देता येईल, यावर सेनेत खलबतं सुरु आहेत.

भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. (Shivsena confused how to give Ratnagiri ZP Chairman Candidature to Bhaskar Jadhav son Vikrant Jadhav)

मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी त्यांनी याअगोदर देखील बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीत असताना त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सेनापक्षप्रमुख आपल्याला मंत्रिपद देतील, अशी आशा त्यांना होती.

शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना

भास्कर जाधव हे यापूर्वी शिवसेनेत होते. मात्र काही कारणांनी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीत असताना त्यांना महत्त्वाच्या खात्यांवर तसंच मंत्रिपदावर कामाची संधी मिळाली. तसंच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर देखील त्यांना काम करण्याची संधी शरद पवारांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी

भास्कर जाधवांच्या नाराजीचे पडसाद रत्नागिरी झेडपी अध्यक्ष निवडणुकीत?

(Shivsena confused how to give Ratnagiri ZP Chairman Candidature to Bhaskar Jadhav son Vikrant Jadhav)

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...