Eknath Shinde: एकनाथ शिंदे गट खरोखरंच बहुमताला हजर राहणार की गोव्यातच थांबणार? नेमकी स्ट्रॅटेजी काय?

Eknath Shinde: गुवाहाटीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूर आला आहे. उद्याही आसाममध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे गट खरोखरंच बहुमताला हजर राहणार की गोव्यातच थांबणार? नेमकी स्ट्रॅटेजी काय?
एकनाथ शिंदे गट खरोखरंच बहुमताला हजर राहणार की गोव्यातच थांबणार? नेमकी स्ट्रॅटेजी काय?Image Credit source: ani
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 12:46 PM

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना उद्या बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे समर्थक (Eknath Shinde) आमदारही उद्या मुंबईत येणार आहे. उद्या गुवाहाटीत अतिवृष्टीचा इशारा आहे. त्यामुळे हे आमदार आजच गुवाहाटीवरून गोव्याला येणार आहेत. त्यानंतर गोव्यावरून सकाळीच मुंबईत येणार असून नंतर विधानभवनात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हा प्लॅन ऐनवेळी बदलूही शकतो. या आमदारांना मुंबईत आणण्याचा बी प्लॅनही तयार आहे. एक तर आमदारांना मुंबईत आणणे आणि दुसरं म्हणजे आमदारांना गोव्यातच ठेवून ठाकरे सरकारला पायऊतार होऊ देणे अशी स्ट्रॅटेजी आखली गेली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे सरकारची नेमकी काय स्ट्रॅटेजी असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पहिला प्लॅन

  1. गुवाहाटीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूर आला आहे. उद्याही आसाममध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजच या आमदारांना गुवाहाटीतून काढलं जाणार आहे. या सर्व आमदारांना मुंबई ऐवजी गोव्याला आणलं जाणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी 7 वाजता गोव्यावरून या आमदारांना मुंबईत आणलं जाईल. सकाळी 8 वाजता हे आमदार उद्या ताजमध्ये येणार आहेत. त्याच ठिकाणी भाजपच्या सर्वच आमदारांना ठेवण्यात आलं आहे. भाजपचे आमदार आणि बंडखोर आमदार ताजमध्ये एकत्रं नाश्ता करतील आणि विधानभवनात मतदानाला येतील. मात्र, शिवसेनेचे आमदार मतदानात भाग घेणार नाहीत किंवा क्रॉस व्होटिंग करतील, असं सांगितलं जात आहे. तसं झाल्यास ठाकरे सरकारला पायउतार व्हावं लागणार आहे.

दुसरा प्लॅन

  1. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचा दुसरा प्लॅनही ठरला आहे. त्यानुसार शिंदे गट बहुमत चाचणीवेळी अधिवेशनात हजरच राहणार नाही. या आमदारांना गोव्यातच ठेवलं जाईल. त्यांना मुंबईत येऊ देणारच नाही. त्यामुळे संख्याबळा अभावी ठाकरे सरकार पडेल. नंतर भाजप सरकार स्थापन करेल. त्यानंतर नव्या सभापतींची निवड केली जाईल. आणि नवा सभापती शिंदे गटाला ओरिजीनल शिवसेनेचा दर्जा देऊन त्यांच्यावरील निलंबनाचं संकट दूर करतील, असं सूत्रांनी सांगितलं.
  2. हे सुद्धा वाचा

प्लॅन कधी यशस्वी होणार?

  1. दरम्यान, दुसरा प्लॅन यशस्वी होण्यामध्ये एका गोष्टीची अडचण आहे. ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची. सर्वोच्च न्यायालयात बहु्मत चाचणी संदर्भात संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच 16 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरही येत्या 11 जुलै रोजी निर्णय होणार आहे. त्यामुळेही या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागल्यास शिंदे गटाचा दुसरा प्लॅन धुळीस मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.