NCP Merger : राष्ट्रवादी विलिनीकरणावर सर्वात मोठा ट्विस्ट, रोहित पवारांच्या नव्या दाव्याने एकच खळबळ, तटकरेंविषयी…
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान तटकरेंच्या या विधानावर शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतलीय. त्यांच्या या भूमिकेनंतर तर्कवितर्कांना उधाण आलंय.

Rohit Pawar on NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सध्या नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांनी अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र दिसले असते, असं मोठं विधान त्यांनी केलंय. याआधी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणताही चर्चा झालेली नाही, असं विधान वारंवार केलेलं आहे. आता त्यांनी भूमिका बदलली असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या असं भाष्य केलंय. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान तटकरेंच्या या विधानावर शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतलीय. त्यांच्या या भूमिकेनंतर तर्कवितर्कांना उधाण आलंय.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
रोहित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बातचित केली. यावेळी बोलताना, “जेव्हा अजितदादा होते त्यावेळी हे सगळं का लपवलं होतं. सुनिल तटकरे आज आपली भूमिका बदलत आहेत. त्यामुळे ते भूमिका बदलत असतील तर त्यांच्या मनात काय असेल हे सांगता येत नाही,” अशी रोखठोक भूमिका रोहित पवार यांनी व्यक्त केली. सोबतच विलीनीकरण होत असेल, तसा विचार असेल तर तुम्ही सत्तेत राहणार आहात का? असा महत्त्वाचा सवालही रोहित पवार यांनी तटकरे यांना विचारला.
दोन-चार दिवसांत काय काय घडलं?
दरम्यान, तटकरे यांनी हे विधान केल्यानंतर शरद पवार यांना भेटीला येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यांची प्रकृती सध्या बरी नाही. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करायला नेतेमंडळी जात आहेत. 5 नोव्हेंबर रोजी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याआधी अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवार यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली होती. या सर्व घडामोडी घडत असताना भविष्यात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.