AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला साहेबांचं प्रेम कधी कळलंच नाही, रोहित पवारांची प्रफुल्ल पटेलांवर कडाडून टीका

बंड केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पटेल यांच्यावर टीकास्त्र सोडले.

तुम्हाला साहेबांचं प्रेम कधी कळलंच नाही, रोहित पवारांची प्रफुल्ल पटेलांवर कडाडून टीका
| Updated on: Jul 06, 2023 | 3:15 PM
Share

मुंबई : बंडानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या काल झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणारे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. तुम्हाला साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, अशी टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली आहे.

रोहित पवार रोज ट्विट करत अजित पवार गटावर निशाणा साधत आहेत. थोड्या वेळापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

प्रफुल्ल पटेल साहेब, मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली. जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं..म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी पटेलांवर टीकास्त्र सोडले आहे.

आपले वडील मनोहरभाई यांच्या निधनानंतर पवार साहेबांनी आपल्यावर दाखवलेलं प्रेम आणि माया सर्वश्रृत आहे. पवार साहेबांचा सखा, सोबती म्हणून आपली राजकारणात ओळख होती. पण असं काय झालं की, आपल्यालाल मोठं करणाऱ्या आपल्याच गुरूला आपण फसवलं ? असा सवालही प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला आहे.

तुम्हाला काय केलं होतं कमी ? का पत्करली गुलामी ?

काय म्हणाले होते प्रफुल्ल पटेल ?

अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही चूक होती तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्तेत का बसवले? त्यांना विरोधी पक्षनेते पद का दिलं ? असा थेट सवाल प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना केला. एमईटी मैदानावरील मेळाव्याला संबोधित करताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच मी पुस्तक लिहीलं तर मोठा भूकंप होईल, असा दावाही त्यांन कालच्या भाषणात केला होता.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.