भाडोत्रींची गर्दी, सत्तेची मस्ती, भोजनभाऊ, खोकेवाल्यांचा प्रश्न, सामनातून शिंदेंच्या भाषणाची पिसं काढली

एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आलं आहे. वाचा...

भाडोत्रींची गर्दी, सत्तेची मस्ती, भोजनभाऊ, खोकेवाल्यांचा प्रश्न, सामनातून शिंदेंच्या भाषणाची पिसं काढली
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 8:55 AM

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा शिवतीर्थवर (Uddhav Thackeray Dasara Melava )तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा झाला. यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमनातून शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. याला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) उत्तर देण्यात आलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भाषणाचा ‘ठाकरी’ शैलीत समाचार घेण्यात आला आहे. “एकीकडं विचारांचं सीमोल्लंघन, तर दुसरीकडे भोजनभाऊंची गर्दी!”, असं म्हणत एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde Dasara Melava) टीका करण्यात आली आहे.

“शिवतीर्थावरील गर्दी भाडोत्री आणि पोटार्थी नव्हती हे एव्हाना तमाम महाराष्ट्राला समजले आहे. ‘मिंधे’ गटाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बीकेसी मैदानावरील मेळाव्यात स्पष्टच सांगितले, ”मी मनात आणले असते तर शिवाजी पार्क त्यांना मिळू दिले नसते.” ही धमकी समजावी की सत्तेची मस्ती?”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

लोकांचे डोके ठिकाणावर आहे. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी विचारांचेच सीमोल्लंघन केले. ‘बीकेसी’वर भोजनभाऊंची गर्दी झाली असेल तर तो खोकेवाल्यांचा प्रश्न!, असं म्हणत सामनातून शिंदेगटावर टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेचा ऐतिहासिक, पारंपरिक दसरा मेळावा नेहमीप्रमाणे त्याच उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या वेळचा जोश, गर्दी, उत्साह नेहमीपेक्षा जरा जास्तच होता. शिवतीर्थ भरून, ओसंडून वाहत होते. त्यामुळे डॉक्टरांची वाकण्याची परवानगी नसतानाही आम्ही निष्ठावान शिवसैनिकांपुढे वाकून नतमस्तक झालो. शिवसैनिकांच्या निष्ठा आणि जनतेचे हे असे प्रेम हेच आमचे बळ. त्या बळावरच पाठीत खुपसलेले खंजीर पचवून आम्ही उभे आहोत. शिवतीर्थावरील गर्दी भाडोत्री आणि पोटार्थी नव्हती हे एव्हाना तमाम महाराष्ट्राला समजले आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.