NCP Merger : मोदी बारामतीला येणार, अमित शाह पुण्यात.. विलिनीकरणावरून शिंदेंच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

NCP Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अहिर म्हणाले की, मोदी बारामतीला येणार आहेत, तर अमित शाह पुण्याला येत आहेत. या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या, त्यातून त्यांना ताकद मिळेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. तसेच विलिनीकरणाबाबत शिवसेनेची कोणतीही भूमिका नसून, एकनाथ शिंदे यांना विचारलं जाईल तेव्हा ते भूमिका मांडतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

NCP Merger : मोदी बारामतीला येणार, अमित शाह पुण्यात.. विलिनीकरणावरून शिंदेंच्या बड्या नेत्याचं सूचक विधान
NCP merger news
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 9:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विषय संपल्याचं नेत्यांकडून सांगितलं जात असतानाच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. विलिनीकरण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे भेटीचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरु आहे. पण असं असलं तरी दोन्ही गटांच्या वतीने विलिनीकरणाच्या मुद्द्याला फुल स्टॉप लागल्याचं म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंनी असा प्रस्ताव आलेला नसून, दादा होता तेव्हा विलिनीकरण निश्चित होणार होतं, पण आता तो विषय संपला असल्याचं जाहिर केलं आहे. त्याशिवाय अजित पवार गटाच्या नेत्यांनीही आम्ही फक्त आधीच्या झालेल्या गोष्टींवर विधान केली आहेत, कधी काय बोलायचं हा आमच्या राजकारणाचा भाग असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय.

Loading...

पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये विलिनीकरणावर काही चर्चा होणार का याकडे लक्ष लागलेलं होतं.परंतु या बैठकीत केवळ कामकाजाबद्दल चर्चा झाल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच जर विलिनीकरणाचा काही विषय असेल, तर त्याची माहिती आम्हाला दिल्याशिवाय पक्षांचं विलिनीकरण होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

त्यांनी म्हटलं की, हे विलिनीकरण आम्हाला विचारल्याशिवाय होणार नाही. त्यानंतर आता महायुतीतील महत्त्वाचे नेते शिवसेनेचे सचिन आहिर यांनी नवं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, विलीनीकरण हा एनसीपीचा अंतर्गत प्रश्न आहे. मविआचे प्रमुख नेते डीलीमिटेशबाबत काय भूमिका मांडतात ते पाहा त्यांच्यात विसंगती आहे. मोदी बारामतीला येणार आहेत, चर्चा होईल. अमित शाह पुण्यला येत आहेत, दोन्ही गोष्टी पाहा, त्यांना ताकद मिळेल, असं वक्तव्य आहिरांनी केलं आहे.

त्याचवेळी सुळेंनी विलीनीकरणाबाबत संभ्रम दूर करावा. डीलीमिटेशनला अनेक खासदार आहेत. लोकसंख्या जास्त निधी कमी त्यामुळे ते गरजेचं आहे, शिवसेनेची भुमिका विलनिकरणाबाबत काहीच नाहीत. एकनाथ शिंदेंना विचारतील तेव्हा ते भूमिका मांडतील, असं अहिर म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us