AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी आधी ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टीची मागणी

आज आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार आहे. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी आधी एका आमदाराची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपमधील हे अंतर्गत राजकारण आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी आधी 'या' आमदाराची पक्षातून हकालपट्टीची मागणी
Bjp
| Updated on: Dec 05, 2024 | 10:12 AM
Share

आज मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने भाजपमध्ये एकाबाजूला आनंदाच वातावरण असतानाच आता पक्षातूनच एका आमदाराच्या हकालपट्टीची मागणी जोर धरु लागली आहे. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातूनच विरोध वाढला आहे. ते भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत. “रणजीतसिंह मोहिते पाटलांसारखी कीड भाजपात नको, त्यांची आमदारकी काढून घेऊन त्यांना पक्षातून काढा” भाजपचे प्रदेश पदाधिकारी संतोष पाटील यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

काल रणजितसिंह मोहिते पाटील हे विधिमंडळातील गटनेता निवडीसाठी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. रणजितसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच मोहीते पाटील कुटुंब आणि भाजपमधील अंतर वाढलं. लोकसभा निवडणुकीत भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून तिकीट दिलं. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील तुतारी चिन्हावर माढ्यातून लोकसभेची निवडणूक जिंकले.

पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम

माळशिरसमधून पराभूत झालेले भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनीही आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. “रणजितसिंह मोहिते पाटलांनी लोकसभा आणि विधानसभेला पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले. त्यामुळे त्यांची आमदारकी काढून घ्या आणि पक्षातून हकालपट्टी करा” अशी मागणी केली होती. “रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा आणि पत्नी हे दोघेही राम सातपुते यांच्याविरोधात प्रचार करत होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांसारखी कीड पक्षात नको” असं संतोष पाटील यांचं म्हणणं आहे.

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.