AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1984 ला झालं ते झालं, आत्ताचं बोला, शिख दंगलींवर सॅम पित्रोदांचं वक्तव्य

नवी दिल्ली : काँग्रेसचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांच्या शिख दंगलीवरील वक्तव्याने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 1984 च्या शिख दंगलींवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, तेव्हा जे झालं ते झालं, ते सोडा तुम्ही (मोदी सरकार) गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा, असं ते म्हणाले. 1984 चं प्रकरण हा भूतकाळ आहे, […]

1984 ला झालं ते झालं, आत्ताचं बोला, शिख दंगलींवर सॅम पित्रोदांचं वक्तव्य
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांच्या शिख दंगलीवरील वक्तव्याने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 1984 च्या शिख दंगलींवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, तेव्हा जे झालं ते झालं, ते सोडा तुम्ही (मोदी सरकार) गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगा, असं ते म्हणाले. 1984 चं प्रकरण हा भूतकाळ आहे, आत्ताचं बोला, असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

पंजाबमधील प्रचारात 1984 ची शिख दंगल हा मुद्दा बनवला जात असून त्याला दिवंगत पंतप्रधान जबाबदार होते, असा भाजपचा आरोप आहे. यावर सॅम पित्रोदा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, “तुम्ही (सरकार) तर रोज खोटं बोलता, 1984 चं आत्ता काय आलं? तुम्ही पाच वर्षात काय केलं त्याविषयी बोला. 1984 ला जे झालं ते झालं, तुम्ही काय केलं? रोजगार निर्मितीसाठी तुम्हाला मत दिलं, ते तुम्ही केलं नाही. 200 स्मार्ट शहरांसाठी तुम्हाला मतदान मिळालं, पण तेही तुम्ही केलं नाही. तुम्ही काही केलं नाही म्हणून असे मुद्दे उकरुन काढले जात आहेत. थांबवा हे”.

नानावटी आयोगाने शिख दंगलींची चौकशी केली होती, जो भारताचा मोठा नरसंहार होता. लोकांना मारण्याच्या सूचना थेट पंतप्रधान राजीव गांधींच्या कार्यालयातून आल्या होत्या, असा आरोप भाजपने एका ट्वीटच्या माध्यमातून केलाय. यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर या निवडणुकीत राजीव गांधींच्या नावाची एंट्री झाली. मोदींनी राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन असं संबोधलं होतं. त्यानंतर पुन्हा एक आरोप मोदींनी केला. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी युद्धनौका आयएनएस विराटचा वापर कौटुंबीक सुट्टी साजरी करण्यासाठी केला होता, असं मोदी म्हणाले.

VIDEO :

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा