AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्या प्लास्टिक बॉलने खेळण्याचं कारण तरी काय? बंगळुरूच्या सीओईमध्ये असं का करतोय?

हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडियाबाहेर आहे. त्यामुळे टीम इंडियात त्याची उणीव भासत आहे. अष्टपैलू भूमिका बजावत असल्याने त्याची जागा भरून काढणं कठीण झालं आहे. असं असताना बंगळुरू फिटनेसवर काम करत असताना प्लास्टिक बॉलने खेळत आहे. असं करण्याचं कारण काय? समजून घ्या

हार्दिक पांड्या प्लास्टिक बॉलने खेळण्याचं कारण तरी काय? बंगळुरूच्या सीओईमध्ये असं का करतोय?
हार्दिक पांड्या प्लास्टिक बॉलने खेळण्याचं कारण तरी काय? बंगळुरूच्या सीओईमध्ये असं का करतोय?Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 24, 2026 | 9:41 PM
Share

भारतीय संघाला गेल्या काही दिवसात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे संघ बांधणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखादा खेळाडू दुखापत होऊन बाहेर पडला की त्याची जागा भरणं कठीण होत आहे. कर्णधार शुबमन गिलपासून जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा या सारखे खेळाडू दुखापतीने त्रस्त आहे. पण अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण अष्टपैलू हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देतो. तसेच त्याच्यात सामना जिंकवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याचं संघात नसणं आणि त्याची भरून काढणं कठीण दिसत आहे. आयपीएल 2026 स्पर्धेपासून हार्दिक पांड्या मैदानापासून दूर आहे. एका रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसात हार्दिकच्या फिटनेसमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. तसेच आपली क्षमता वाढवण्यासाठी बंगळुरूत सराव करत आहे.

हार्दिक पांड्याच्या फिटनेसचं काय?

रेव्हस्पोर्ट्सच्या एका रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने आपल्या फिटनेसमध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबईहून बंगळुरूत आपलं बस्तान बसवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे. हार्दिक पांड्या रोज 12 षटकांपर्यंत गोलंदाजी करत आहे. हार्दिक पांड्या रोज संध्याकाळी जवळपास 3 ते चार तास सराव करतो. त्याचं सर्वाधिक फोकस हा बॉलिंग वर्कलोड हळूहळू वाढवण्यावर आहे. त्यामुळे संघात परतल्यानंतर फिट अँड फाईन असेल.

हार्दिक पांड्या प्लास्टिक बॉलने खेळतो!

हार्दिक पांड्या फिटनेसवर काम करत असताना प्लास्टिक बॉलने सराव करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण असं करण्यामागे विशेष कारण आहे. प्लास्टिक बॉलसमोर फलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नाही. हा चेंडू जबरदस्त स्विंग होतो. तसेच काँक्रिट किंवा लादीवर टाकल्यास वेगाने येतो. अशा स्थितीत त्याचा सामना करताना विचार करण्यासाठी वेळच नसतो. या सरावामुळे नजर बसते आणि बॅटिंग रिफ्लॅक्स चांगला होतो. हार्दिक पांड्याच्या या सरावामुळे बॉलवर प्रहार करण्याचा वेग आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्याचा हा सराव भारतासाठी फायद्याचाच आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ