खासदार संभाजी छत्रपती नवीन पक्ष स्थापन करणार?, सोशल मीडियात जोरदार चर्चा; आंबेडकरांचीही शनिवारी भेट घेणार

मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. (Sambhaji Chhatrapati will float new political party?)

खासदार संभाजी छत्रपती नवीन पक्ष स्थापन करणार?, सोशल मीडियात जोरदार चर्चा; आंबेडकरांचीही शनिवारी भेट घेणार
Sambhaji Chhatrapati

मुंबई: मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दौरे सुरू झाल्यापासून भाजप आणि त्यांच्यातील अंतरही वाढू लागलं असून भाजपच्या नेत्यांनी तर त्यांच्यावर टीकाही केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून संभाजी छत्रपती यांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर, सोशल मीडियातून संभाजी छत्रपती यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करावा, अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत. त्यामुळे संभाजीराजे नवा राजकीय पक्ष स्थापन करणार का? या चर्चेने जोर धरला आहे. (Sambhaji Chhatrapati will float new political party?)

भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यावेळी मराठा समाजाच्या भावना जाणून घेतानाच काही कायदे तज्ज्ञांशीही त्यांनी चर्चा केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांशी भेटीगाठी सुरू करून मराठा आरक्षणाबाबतच्या पर्यायांची चर्चा सुरू केली आहे. या नेत्यांशी भेटीगाठी केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठा नेत्यांचा आग्रह

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात प्रस्थापित पक्षांना अपयश येत असल्याने आता संभाजीराजेंनी नवा राजकीय पक्ष स्थापन करावा, असा आग्रह मराठा समाजातील प्रमुख लोकांनी त्यांच्याकडे आग्रह धरला आहे. सर्व सामान्य जनता संभाजीराजेंच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील, असे या नेत्यांना वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी राजर्षी शाहू महाराज यांना सर्वच जाती धर्माचे लोक मानतात. संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या चळवळींचे नेतृत्व करत असले तरी सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळेल, असं या लोकांना वाटत आहे.

सोशल मीडियातून चळवळ

संभाजीराजेंनी नवा राजकीय पक्ष काढावा म्हणून आता सोशल मीडियातून चळवळ सुरू झाली आहे. ‘मराठा समाजातील तरुणांचे एकच लक्ष्य, छत्रपती संभाजीराजेंनी काढावा नवीन राजकीय पक्ष’, अशा आशयाचा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल केला जात आहे. अनेक तरुणांनी आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेट्सवर हा मजकूर ठेवला आहे. त्यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?

दरम्यान, संभाजीराजे उद्या शनिवारी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आरक्षणावर चर्चा करणार आहेत. या भेटीत राज्यात नवीन समीकरणे स्थापित करण्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाजीराजे आणि आंबेडकर एकत्र आल्यास राज्यात खऱ्या अर्थाने शिवशक्ती आणि भीमशक्ती निर्माण होऊन महाराष्ट्रात नवीन पर्याय उभा राहू शकतो, असंही म्हटलं जात आहे.

अंतर वाढलं…

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. पण त्यांनी वेळ दिला नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. त्यामुळे भाजप आणि राजेंमध्ये अंतर वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच राजे नवीन पक्ष काढण्याची चाचपणी करू शकतात, असं सांगितलं जात आहे. (Sambhaji Chhatrapati will float new political party?)

 

संबंधित बातम्या:

भाजप नेत्यांनी खासदार संभाजी छत्रपतींच्याविरोधात आघाडी उघडलीय का?

संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा देण्याची शक्यता

राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला ठेका दिला नाही; निलेश राणेंची टीका

(Sambhaji Chhatrapati will float new political party?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI