AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EWS आरक्षण घेतल्यास SEBC चा लाभ घेता येणार नाही, खासदार संभाजीराजेंचे मराठा युवकांना आवाहन

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील युवकांना आर्थिक मागास प्रवर्गातील EWS आरक्षण स्वीकारु नये, असं आवाहन केलं आहे Sambhajiraje EWS Reservation

EWS आरक्षण घेतल्यास SEBC चा लाभ घेता येणार नाही, खासदार संभाजीराजेंचे मराठा युवकांना आवाहन
संभाजीराजे छत्रपती
| Updated on: Nov 22, 2020 | 8:01 PM
Share

मुंबई: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील युवकांना आर्थिक मागास प्रवर्गातील EWS आरक्षण स्वीकारु नये, असं आवाहन केलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी यापूर्वी देखील राज्य सरकारकडे मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको, अशी भूमिका मांडली होती. EWS आरक्षण स्वीकारल्यास SEBC च्या आरक्षणाला अडचण निर्माण होईल, असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं आहे. (Sambhajiraje appeal to Maratha Youth on EWS reservation)

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS आरक्षणाचा लाभ घेण्यास मान्यता दिली होती. नुकतंच उच्च न्यायालयानेदेखील मराठा समाजातील एका विद्यार्थ्यास EWS कोट्यातून शैक्षणिक प्रवेश घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या दोन्ही न्यायालयांनी असा निकाल देत असताना स्पष्टपणे नोंदवले आहे की, जे विद्यार्थी EWS कोट्यातून प्रवेश घेतील त्यांना SEBC आरक्षणाचे कोणतेही लाभ घेता येणार नाहीत. (Sambhajiraje appeal to Maratha Youth on EWS reservation)

“मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर काहींनी EWS आरक्षणचा पर्याय सुचविला होता , मात्र तेव्हापासून समाजाला माझे हेच सांगणे आहे की मराठा आरक्षण रद्द झाले नसून केवळ स्थगिती दिलेली आहे.”, असं संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले.

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणून सिद्ध केले असताना आपण EWS कोट्यातून आरक्षण घेतल्यास त्याचा SEBC आरक्षणाच्या कायदेशीर लढाईवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. EWS चा लाभ घेतल्यास SEBC आरक्षणाला धोका पोहोचू शकतो, हे पूर्वीपासून सांगत आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.

EWS आरक्षणाचा लाभ घेताना SEBC च्या आरक्षणावर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याची हमी राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणीदेखील संभाजीराजेंनी केली आहे. (Sambhajiraje appeal to Maratha Youth on EWS reservation)

आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) आरक्षण फक्त मराठा समाजासाठी नाही

संभाजीराजे यांनी EWS चे आरक्षण फक्त मराठा समाजासाठी नसून इतर समाजासाठी आहे, असं स्पष्ट केले. उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या या निर्णयांमुळे माझी भूमिका स्पष्टपणे अधोरेखित झाली, असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. शिवाय EWS चे १०% आरक्षण हे केवळ मराठा समाजासाठी नसून आर्थिकदृष्ट्या मागास खुल्या वर्गात असणाऱ्या सर्व समाजघटकांसाठी आहे, हेदेखील लक्षात घ्यावे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या: 

SEBC उमेदवारांना भरतीत कसं सामावून घेणार? खुलासा करा, संभाजीराजेंचं थेट ऊर्जामंत्र्यांना पत्र

महामंडळ बरखास्त करायचं टायमिंग चुकलंय, संभाजीराजेंचा ठाकरे सरकारवर प्रहार

(Sambhajiraje appeal to Maratha Youth on EWS reservation)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.