अशोकराव, आम्ही सुद्धा 96 टक्केवाले, नांदेडमधील गैरहजेरीवरुन संभाजीराजेंचा हल्लाबोल

अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असं म्हणत संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांवर कडाडून टीका केली.

अशोकराव, आम्ही सुद्धा 96 टक्केवाले, नांदेडमधील गैरहजेरीवरुन संभाजीराजेंचा हल्लाबोल
Sambhajiraje Chhatrapati

नांदेड : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडमधील मराठा मोर्चाला संबोधित करताना, काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, त्यावेळी त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता” असा घणाघात संभाजीराजेंनी केला.

अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असं म्हणत संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांवर कडाडून टीका केली.

प्रकाश आंबेडकरांचं कौतुक

प्रकाश आंबेडकर आमच्या आंदोलनात आले, त्यांचं कौतुक …! गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही तुमची भूमिका. देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ. हेच या सरकारने सांगितले त्यामुळे शोषित वंचितांना आरक्षण मिळालेच पाहिजे , असं संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे यांच्या भाषणातील मुद्दे

 • 58 मोर्चे आपण काढले, समाजाने आपली भावना व्यक्त केली, समाज बोलला, समन्वयक बोलले , आता लोकप्रतिनिधीनी बोलायला हवं म्हणून हे आंदोलन
 • आंदोलनात सहभागी नागरिकांना शांत राहण्याचे राजेचे आवाहन
 • नांदेड: लोकांच्या भावना मेडियानी दाखवावयात
 • शाहू महाराजानी सगळ्यांना आरक्षण दिलं , मराठवाड्यातील मराठा समाज गरीब आहे , त्यांची कोण बाजू मांडणार
 • 58 मोर्चे काढले पण आता आपला आवाज दिल्लीत उठला पाहिजे
 • काँग्रेसचे आमदार मोहणराव हंबर्डे, तथा शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे आंदोलन स्थळी दाखल
 • संसदेत मी बोलण्यासाठी परवानगी मागितली पण परवानगी मिळाली नाही, म्हणून लक्षात आलं कुठलीही गोष्ठ भांडल्या शिवाय मिळत नाही
 • दिल्लीतून औरंगजेबाच्या तावडीतून सुटलेलो आपण
 • संसदेत बोलायला देताना राज्यातील खासदारांनी मदत केली, त्यांचे आभार
 • संसदेत बोलू दिलं नाही तर खासदारकी काय कामाची असा विचार मनात आला
 • आरक्षण रद्द झाल्यावर आता काय करायचंय, केंद्र आणि राज्य सरकारे एकमेकांनावर जवाबदारी ढकलतात
 • पण आम्हाला त्याच्याशी घेणेदेणे नाही, आम्हाला आरक्षण हवं
 • राज्यांनी पुनर्विचार दाखल केली पण पाठपुरावा केला नाही
 • आरक्षण रद्द झालं, परत आरक्षण मिळवायचं असेल तर मागासलेपण सिद्ध करावं लागेल
 • राज्य सरकार म्हणतय 50 टक्क्यांची मर्यादा हटवावि लागेल पण
 • मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय उपयोग नाही
 • मंत्री अशोक चव्हाण आज कुठे दिसत माही इथे
 • त्यांनी ही मागासलेपण सिद्ध करण्याची जवाबदारी घ्यायला हवी
 • भोसले आयोगातील त्रुटी दूर कराव्या लागतील
 • सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्याची राज्याची जवाबदारी
 • केंद्र सरकारची जवाबदारी- राज्याला आरक्षणाला दिले अधिकार पण इंदिरा सहानी खटल्या नुसार 50 टक्के च्या वर आरक्षण देता येत नाही, त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल
 • दुर्गम किंवा डोंगरावर राहणाऱ्यांना आरक्षण मग आरक्षण कस द्यावे लागेलं
 • केंद्राने दूरवर दुर्गम ही अट काढून गरीब आणि भौगोलिक परिस्थिती नुसार आरक्षण द्या यासाठी घटना दुरुस्ती करणे केंद्राची गरज
 • राज्य/ केंद्र सरकार ने ही जवाबदारी पार पाडावी
 • आता वकीलासारखी माझी भाषा
 • आमनेसामने होऊ देत
 • नांदेडचे सुपुत्र दिल्लीत आले, अनेकांना भेटले पण मला भेटायला वेळ न्हवता , का भेटले नाहीत अशोक चव्हाण वर टीका
 • समाजाला दिशाहीन करता येणार नाही त्यासाठी मी बसलोय इथे
 • मला 15 पानी पत्र आलय मुख्यमंत्र्यांच, आंदोलनाची दखल घेतलीय त्यांनी, त्यात खुप साऱ्या तफावती आहेत
 • कोल्हापूर नाशिक ला आंदोलन झालं , पण तिथं लोक कमी होते पण नांदेडकरांचा नाद कुणी नाही करू शकत , प्रचंड गर्दी झाल्याने नांदेड करांचे कौतुक
 • नाशिकला छगन भुजबळ आले पण नांदेडला पालकमंत्री आले नाही
 • पालकमंत्री यांनी आम्हाला हाथात पत्र द्यावे हवे होते
 • आम्ही हे पत्र स्वीकारत नाही
 • राजे ची रोखठोक भूमिका
 • आता माझा प्रश्न आहे – हे पत्र मला पटले नाही, त्यात खूप तफावती आहेत
 • शासनाने दिले ते पत्र स्थानिक समन्वयकांनी फाडले – मात्र हे मला मान्य नाही – राजे
 • 15 जुलैला सरकारचा एक जीआर निघाला , 2014 ते कोव्हिडं च्या दरम्यान नियुक्त्या झालेल्याना रुजू करून घेण्याबाबत हा जीआर – यावर लोक खुश झाले पण नंतर आरक्षण रद्द झाल्याने मुलांच्या आयुष्याशी खेळ झालाय….
 • 2014 पासून ज्यांची निवड झाली त्यांना नियुक्त्या दिल्याचं नाही त्यांची काय चूक होती – राजेंचा सवाल

या मुलांवर अन्याय होता कामा नये, या गरीब मराठ्यांची काय चूक आहे

परवा अशोक चव्हाण बोलले , 23 वसतिगृह आम्ही सुरू करणार आहोत पण ठाणे सोडलं तर कुठलही वसतिगृह सुरू झालं नाही, त्यात मागच्या सरकारने च केलेले आहेत , तुम्ही नव्याने कोणते बनवले याचे उत्तर द्या : अशोक चव्हाण यांना सवाल
अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत
आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही आमही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत.
अशोक चव्हाण वर कडक टीका
प्रकाश आंबेडकर आमच्या आंदोलनात आले, त्यांचं कौतुक …! गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही तुमची भूमिका
देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असे सांगितले होते , हेच या सरकारने सांगितले त्यामुळे शोषित वंचितांना आरक्षण मिळालेच पाहिजे – राजे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI