अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा? संदीप देशपांडेंचं मनसेप्रवेशाचं आवताण

मंत्रालयातील गोड गोड अळूचं फदफदं आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी. निर्णय तुमचा, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे

Sandeep Deshpande appeal to enter MNS, अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा? संदीप देशपांडेंचं मनसेप्रवेशाचं आवताण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना मनसेप्रवेशाचं आवताण देण्यात येत आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मनसेत सामील होण्याचं अप्रत्यक्ष आवाहन (Sandeep Deshpande appeal to enter MNS) शिवसैनिकांना ट्विटरवरुन केलं आहे.

‘मंत्रालयातील गोड गोड अळूचं फदफदं आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी. निर्णय तुमचा… ।। मराठा तितुका मेळावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’ असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

मनसेने कालच प्रमोशनल व्हिडीओ प्रदर्शित केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज व्हिडीओमध्ये ऐकायला मिळाला होता. त्यानंतर ‘ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे’ असं म्हणत शिवसैनिकांना मनसेप्रवेशाची साद घातली होती.

23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मनसे पक्षाचा झेंडा आणि अजेंडा (हिंदुत्वाची कास) बदलण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.

मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असणार आहे. यावर सोनेरी रंगाच्या षटकोनात राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिलं असल्याची शक्यता आहे. सुलेखनकार अच्युत पालव यांनी हे डिझाईन केले आहे.

दुसरीकडे मनसेच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरवरुन झेंडा गायब झाला आहे. त्यामुळे आता फक्त रेल्वे इंजिनचंच चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने, आता मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसापासून तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 23 जानेवारीला मनसेच्या कारकिर्दीतील पहिलं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे मनसैनिकांचं लक्ष (Sandeep Deshpande appeal to enter MNS) लागलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *