सांगलीच्या महापौरांचा राजीनामा, राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भिडले

सक्षम महिला पदाधिकारी आणि स्वत:चे निर्णय घेणाऱ्या महापौर अशी संगिता खोत यांची ओळख (ncp leader fight after sangli mayor resign) होती.

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 23:07 PM, 20 Jan 2020
सांगलीच्या महापौरांचा राजीनामा, राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भिडले

सांगली : सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी आज (20 जानेवारी) पालिकेच्या महासभेत राजीनामा (ncp leader fight after sangli mayor resign) दिला. खोत यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे बागवान आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक अखतर नायकवडी यांच्यात वादावादी झाली.

“भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या तुमच्या नेत्याचे आदेश मानून संगीता खोत तुम्ही राजीनामा दिला. पूर्वी मिरज बदनाम झाली होती, पण तुमच्या राजीनाम्यामुळे मिरजेचा मान वाढेल,” असे वक्तव्य मेनुद्दीन बागवान यांनी केलं. या वक्तव्यानंतर इद्रिस नायकवडी यांचे पुत्र राष्ट्रवादीचे नगरसेवक अखतर नायकवडी हे संतप्त झाले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना काही वर्षांपूर्वी राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र नायकवडी यांनी राजीनामा दिला नव्हता. या घटनेचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख नाव न घेता बागवान यांनी केला. यामुळे बागवान आणि नायकवडी यांच्यात वादावादी (ncp leader fight after sangli mayor resign) झाली.

अखतर नायकवडी यांनी सभागृहात उभा राहून आक्षेप घेतला. एच. सी. एल ठेकेदारामुळे सांगली महापालिका बदनाम झाली नव्हती का? असा प्रश्नही नायकवडी यांनी उपस्थित केला. त्याशिवाय बागवान यांनी नाव घेऊ बोलावं, असं ही नायकवडी म्हणाले.

सांगलीच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा

सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धीरज सूर्यवंशी आज (20 जानेवारी) पालिकेच्या महासभेत राजीनामा  दिला. महापालिकेच्या आयुक्तांकडे महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोत आणि सूर्यवंशी यांना याआधीच राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर महापौर संगिता खोत यांना अश्रू अनावर झाले. त्या महासभेत बोलताना अचानक रडू लागल्या. संगिता खोत या भाजपच्या सांगली महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर होत्या. त्यांनी सांगली महापुरावेळी पाण्यात उतरुन काम केलं होतं. सक्षम महिला पदाधिकारी आणि स्वत:चे निर्णय घेणाऱ्या महापौर अशी संगिता खोत यांची ओळख (ncp leader fight after sangli mayor resign) होती.