Shivsena Vs Eknath Shinde: कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटाकडे जाणार असल्याची चर्चा ऐकल्यानंतर संजय पवार यांना धक्का बसला

अजूनही एक मन म्हणताय हे दोन्ही खासदार असं काही करणार नाहीत अशी भावनिक प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने दोघांवरही शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत. शिवसैनिकांनी मोठ्या इर्षेन त्यांना खासदार केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व संजय मंडलिक आणि धैर्यशील माने करतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांना आहे असेही संजय पवार म्हणाले.

Shivsena Vs Eknath Shinde: कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटाकडे जाणार असल्याची चर्चा ऐकल्यानंतर संजय पवार यांना धक्का बसला
Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 6:02 PM

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी बंड करत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप केला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. या खासदारांमध्ये शिवसेनेच्या कोल्हापूरमधील दोन्ही खासदारांच्या नावाचा समावेश आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. दोन्ही खासदार शिंदे गटाकडे जाणार असल्याची चर्चा ऐकल्यानंतर धक्का बसला अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी दिली.

अजूनही एक मन म्हणताय हे दोन्ही खासदार असं काही करणार नाहीत अशी भावनिक प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने दोघांवरही शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत. शिवसैनिकांनी मोठ्या इर्षेन त्यांना खासदार केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व संजय मंडलिक आणि धैर्यशील माने करतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांना आहे असेही संजय पवार म्हणाले.

निधी मिळाला नाही हे बाहेर पडायचं कारण होऊ शकत नाही

निधी मिळाला नाही हे बाहेर पडायचं कारण होऊ शकत नाही. कोणालाच निधी मिळालेला नाही. निधीचे कारण सांगून असं कोणी करू नये असेही संजय पवार म्हणाले.

जीवाचं रान करून शिवसैनिकांनी यांना खासदार म्हणून निवडून आणलं

शिवसेनाप्रमुख नेहमीच खंत व्यक्त करत होते माझा खासदार इथे का होत नाही. त्यांच्यासाठीच जीवाचं रान करून शिवसैनिकांनी यांना खासदार म्हणून निवडून आणलं. त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवसैनिक झटले.आम्ही त्याच्यासाठीच राबलो आहोत. फक्त गटाच्या भावना ऐकून घेऊ नका शिवसैनिकांच्या भावनाही समजून घ्या. मागच्या वेळी मोदींचा करिष्मा असूनही मंडलिक हरले होते. हा करिष्मा उद्धव ठाकरेंचा, शिवसेनेचा आणि मतदारांचा होता. हा मोदींचा करिष्मा असू शकत नाही. एक मराठा म्हणून संजय मंडलिक जिल्ह्याचे नेतृत्व करू शकतात. तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ नका उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभं राहा. ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत अशी खात्री आहे घेतलाच तर पाहू असे संजय पवार म्हणाले.

शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर

शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. शिंदे गटाची एक बैठक पार पडलिी. या ऑनलाईन बैठकीला शिवसेनेच्या 14 खासदारांनी हजेरी लावली होती. शिवसेनेच्या गोटात चिंता वाढली असून, जर हे खासदार शिंदे गटात गेले तर शिवसेनेला आणखी मोठं भगदाड पडणार आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.