Republic Day 2026 Parade LIVE : आज कर्तव्य पथावर जग पाहणार भारताची शान, ताकद, यंदा काय खास?
77th Republic Day Parade Live Updates in Marathi : आजच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सुरुवात 10.30 वाजता होईल. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद वीरांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर परेडसाठी कर्तव्य पथावर पोहोचतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, युरोपीय परिषद आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष पारंपारिक बग्गी मधून येतील.

LIVE NEWS & UPDATES
-
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजवंदन
छत्रपती संभाजीनगर – 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजवंदन. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी चंद्रकांत खैरे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती असेल.
-
शिवसेनेच्या माजी आमदाराचा भाजपात पक्ष प्रवेश
मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात आज मौसा लातूरचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे होणार भाजपात पक्ष प्रवेश. मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल. थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिथितीत होणार पक्ष प्रवेश.
-
-
77th Republic Day 2026 : 30,000 पेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात
प्रजासत्ताक दिन असल्याने दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत मल्टी-लेयर सिक्योरिटी तैनात आहे. यात 30,000 पेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात आहेत.
-
77th Republic Day 2026 : नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्री असताना गिरीश महाजन करणार ध्वजवंदन
मंत्री गिरीश महाजन आज नाशिकला करणार ध्वजवंदन. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन आणि पोलीस संचलन कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन राहणार उपस्थित. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण नंतर आता ध्वजवंदन. नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्री असताना कुंभ मंत्री गिरीश महाजन करणार ध्वजवंदन.
-
धाराशिवमध्ये निर्माण झालेल्या गोंधळावर प्रताप सरनाईक यांच्याकडून पडदा
एबी फॉर्म वाटपावरून धाराशिवमध्ये शिवसेनेत निर्माण झालेल्या अंतर्गत गोंधळावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अखेर पडदा. शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मागितली माफी. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. शिवसेनेच्या ज्या जागा भाजपला देण्यात आल्या आहेत, त्या जागा पुन्हा शिवसेनेकडे घेतल्या जातील असं ठाम आश्वासन प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे. एबी फॉर्म वाटपावरून निर्माण झालेला संभ्रम, अंतर्गत नाराजी आणि पक्षातील गोंधळ यावर आम्ही पर्याय काढू असेही पालकमंत्री प्रथम सरनाईक म्हणाले.
-
-
काँग्रेसने शेतकऱ्यांवर अत्याचार केले – नवनीत राणा
काँग्रेसने शेतकऱ्यावर अत्याचार केले. शेतकऱ्यांच्या मुलाला बारा तास शेतात राबवून शेतकऱ्यांवर खरे अत्याचार या काँग्रेस पक्षाने गेली साठ वर्ष केले. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका. अन्यथा शेतकऱ्यांचा प्रत्येक मुलगा आज अधिकारी म्हणून शासकीय कार्यालयात बसला असता.
-
77th Republic Day 2026 : कर्तव्य पथावर गर्दी जमू लागली
77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडआधी कर्तव्य पथावर तयारी पूर्ण झाली आहे. मोठ्या संख्येने लोक कर्तव्य पथावर पोहोचत आहेत. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तपासणीशिवाय कोणालाही प्रेक्षक रांगेत बसू दिलं जाणार नाही.
-
-
77th Republic Day 2026 : विकसित भारताचा संकल्प अधिक भक्कम होवो – पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या आन-बान आणि शानचा प्रतीक आहे. हे राष्ट्रीय महापर्व तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवी उत्साह घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प अधिक भक्कम होवो, हीच कामना.
सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की बहुत-बहुत बधाई। भारत की आन-बान और शान का प्रतीक यह राष्ट्रीय महापर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। विकसित भारत का संकल्प और अधिक सुदृढ़ हो, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2026
-
77th Republic Day 2026 : संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट
आज प्रजासत्ताक दिन असून कर्तव्य पथावर परेड होणार आहे. त्यासाठी संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट आहे. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.
आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आहे. याच दिवशी देशात संविधान लागू झालं होतं. कर्तव्य पथावर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पहायला मिळेल. राफेल, सुखोई, जॅग्वार ही फायटर विमानं आपलं कौशल्य सादर करतील. त्याशिवाय देशातील सांस्कृतिक परंपरा आणि सैन्य ताकद यांनी शानदार झलक पहायला मिळेल. कर्तव्य पथासह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10,000 जवान ड्युटीवर तैनात आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष एंटोनियो कोस्टा आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन प्रमुख पाहुणे आहेत. हे वर्ष यासाठी सुद्धा खास आहे की, यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. कर्तव्य पथाला भव्यतेने सजवण्यात आलं आहे.
Published On - Jan 26,2026 7:28 AM
