AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Pawar : कोल्हापुरात संजय पवारांचा राजेश क्षीरसागरांवर घणाघात, मेळाव्यात ऑडिओ क्लीप ऐकवत हकालपट्टीची मागणी

राजेश क्षीरसागर यांनी देखील संजय पवारांनी केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर दिलंय. माझ्याकडेही संजय पवारांची व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा राजेश क्षीरसागर यांनी केलाय.

Sanjay Pawar : कोल्हापुरात संजय पवारांचा राजेश क्षीरसागरांवर घणाघात, मेळाव्यात ऑडिओ क्लीप ऐकवत हकालपट्टीची मागणी
राजेश क्षीरसागर, संजय पवार
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 6:59 PM
Share

कोल्हापूर : पक्षात झालेल्या सर्वात मोठ्या बंडानंतर शिवसेनेकडून आता पक्ष पुनर्बांधणी केली जातेय. त्यासाठी जिल्हास्तरावर मेळावे ( Melawa) होत आहेत. बंडखोरांबद्दलचा शिवसैनिकांचा संताप देखील दिसून येतोय. पुराव्यानिशी पदाधिकारी बंडखोरांची ओळखून करताहेत. त्याचाच प्रत्येक आज कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात आला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिपच (Audio Clip) भर मेळाव्यात ऐकवली. राजेश क्षीरसागर यांच्या पक्षातून हकालपट्टीची मागणी केली. आज कोल्हापुरात (Kolhapur) शिवसेना जिल्हा मेळाव्यात जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ऐकलेल्या या ऑडिओ क्लिपने खळबळ उडालीय. शिंदे गटात सामील झालेल्या कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याबद्दलचा संताप संजय पवार यांनी पुराव्यानिशी असा व्यक्त केला. या ऑडिओ क्लिपमध्ये निवडून येण्यासाठी शिवसेना पाहिजे असं नाही, असं राजेश क्षीरसागर म्हणतात. याच त्यांच्या वाक्यावर संजय पवार चांगलेच भडकलेत. तुम्ही कितीही रंग बदलले तरी तुमच्या कपाळावर आणि पाठीवर पडलेला गद्दारचा शिक्का पुसला जाणार नाही, अशा शब्दात पवारांनी क्षीरसागर यांचा समाचार घेतला.

शिवसेनेच्या मेळाव्यात राजेश क्षीरसागरांवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह केलेल्या बंडानंतर पक्ष पुनर्बांधणीचा मोठं आव्हान उद्धव ठाकरे समोर आहे. त्यासाठी शिवसेना नेत्यांकडून जिल्हास्तरावर बैठका, मेळावे घेतले जाताहेत. नवीन पदाधिकारी निवडी होत आहेत. या मेळाव्यांमध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करत असले तरी सेना पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांबद्दल व्यक्त केला जाणारा संतापच चर्चेचा विषय ठरतोय. संजय पवार यांनी ऐकवलेल्या ऑडिओमुळे त्याचा पुन्हा एकदा प्रत्यंतर आला. शिंदे गटातील आमदारांबद्दल शिवसैनिकांमध्ये किती टोकाचा रोष आहे हेच यातून स्पष्ट होतं. अर्थात याला स्थानिक पातळीवर चालणारी गटबाजीदेखील कारणीभूत आहे. कोल्हापुरातील शिवसेनेत नेहमीच गटबाजी पाहायला मिळाली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय पवारांना पक्षाने तिकीट नाकारत राजेश क्षीरसागर यांना संधी दिली. इथूनच त्यांच्यामधील अंतर्गत वादाला सुरुवात झाली. आता राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाल्याने संजय पवार यांना देखील त्यांच्यावर हल्लाबोल करायला संधीच मिळालीय.

संजय पवारांची व्हिडीओ क्लिप असल्याचा दावा

दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी देखील संजय पवारांनी केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर दिलंय. माझ्याकडेही संजय पवारांची व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा राजेश क्षीरसागर यांनी केलाय. माझ्या निवडणुकीत गद्दारी कोण करत होतं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. निवडणुकीत तुमचं डिपॉझिट जप्त झालं असा टोला देखील राजेश क्षीरसागर यांनी संजय पवार यांना लगावलाय. कोल्हापूर शिवसेनेतील गटबाजी नवी नाही. पण नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेला नाकारल्याने सर्वच गट एकत्र आले होते. त्याचाच परिणाम म्हणून गोकुळ, जिल्हा बँक अशा महत्त्वाच्या सत्ता स्थानांवर शिवसेनेला संधी मिळाली. मात्र पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आता पुन्हा हवा नव्याने उफाळून आलाय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.