AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : माझ्या आणि राज ठाकरेंच्या भेटीची इतरांना मळमळ का? विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीसही बसरसले

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून फडणवीसांवर टीकेची झोड उडवण्यात आली. यावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही फडणवीसांची खिल्ली उडवली होती. मात्र फडणवीसांनीही त्या भेटीबाबत विरोधकांना त्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Raj Thackeray : माझ्या आणि राज ठाकरेंच्या भेटीची इतरांना मळमळ का? विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीसही बसरसले
माझ्या आणि राज ठाकरेंच्या भेटीची इतरांना मळमळ का? विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीसही बसरसलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2022 | 6:30 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणाचं ज्या भेटीकडे लक्ष लागलं होतं. ती भेट आज अखेर पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घरी दाखल होत त्यांची भेट घेतली आणि विविध विषयावर चर्चा केली. मात्र या भेटीनंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा अनेक चर्चांना उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस भेटायला गेल्यावर राज ठाकरे यांच्याकडूनही फडणवीसांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. तर शर्मिला ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे औक्षणही केलं. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून फडणवीसांवर टीकेची झोड उडवण्यात आली. यावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही फडणवीसांची खिल्ली उडवली होती. मात्र फडणवीसांनीही त्या भेटीबाबत विरोधकांना त्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

पाहा भेटीचा व्हिडोओ

फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले. मला असं वाटतं की या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे. त्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकांशी संबंध ठेवणं हे कुठेही गैर नाही. राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं त्यानंतर अनेक नेते त्यांना भेटायला गेले, मी तर स्वतः सभागृहात देखील त्यांना भेटायला जाणार असल्याचं उल्लेख करून सांगितलं होतं. मग मी त्यांना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय आहे? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच अमित ठाकरे यांना मंत्रीपद देणार, त्यानंतर मी माइक ओढून घेतला, अशी टीका ही जाणूनबुजून होत आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसंना एक खोचक टोला लगावला होता. राज्यात फाइव स्टार संस्कृती सुरू झाली आहे. 105 आमदार असणारा नेता एक आमदार असणाऱ्या नेत्याला भेटायला जातो, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्या भेटीवर केली होती. त्याच टीकेला आता फडणवीसांनीही जोरदार उत्तर दिलं आहे. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीने पुन्हा मनसे आणि भाजपच्या युतीच्या राजकीय चर्चांणाही उधाण आलं आहे. आगामी महापालिकेत भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता अनेक राजकीय पंडितांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र आमची भूमिका अद्यापही एकला चलो रे चीच आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.