Republic Day Wishes : बलसागर भारत होवो…प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, स्टेटस ठेवण्यासाठी आहेत बेस्ट
भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावरील दिमाखदार परेड, भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि विविध राज्यांच्या चित्ररथांची संपूर्ण माहिती तसेच आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा संदेश येथे वाचा

आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. आज २६ जानेवारी १९५० रोजी भारताने आपल्या संविधानाचा स्वीकार केला. त्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपली मोहोर उमटवली. या ऐतिहासिक घटनेला आज ७७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. सध्या लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत तिरंगा डौलाने फडकत आहे.
कर्तव्य पथावर काय घडणार?
राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे आजही दिमाखदार परेडचे आयोजन करण्यात आले आहे. आज राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर जन गण मनच्या सुरावलींनी आणि २१ तोफांच्या सलामीने आसमंत दुमदुमून गेला. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तुकड्यांनी शिस्तबद्ध संचलन करत भारताची ताकद जगाला दाखवून दिली. अत्याधुनिक रणगाडे आणि क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन हे या परेडचे मुख्य आकर्षण असेल. महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या चित्ररथांनी भारताची संस्कृती आणि कला लोकांसमोर मांडली. यामध्ये भारताची डिजीटल प्रगती आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला होता.
प्रियजनांसाठी शुभेच्छा संदेश
- आमचा स्वाभिमान आणि आमची ओळख, भारताचे संविधान! ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा.
- शहीदांच्या बलिदानाला स्मरून, आज पुन्हा एकदा देशाच्या प्रगतीची शपथ घेऊया. प्रजासत्ताक दिन २०२६ च्या शुभेच्छा!
- नवा उत्साह, नवा संकल्प! प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक भारतीय नागरिकाचे अभिनंदन.
- बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! या संकल्पासह प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा.
- उत्सव बलिदानाचा, उत्सव संविधानाचा, उत्सव माझ्या भारताचा! ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक भारतीयाला मानाचा मुजरा.
- रंग बलिदानाचा तो लाल, रंग शांतीचा तो पांढरा, रंग समृद्धीचा तो हिरवा… आणि या तिघांना जोडणारा तो निळा अशोक चक्राचा धागा! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- गर्जत राहो जयघोष भारताचा, सन्मान राखूया आपल्या संविधानाचा, अभिमानाने फडकतोय आज तिरंगा आकाशी, नतमस्तक होऊया त्या शूरवीरांच्या बलिदानापाशी!
- ना जात पाहतो, ना धर्म पाहतो, हा देश फक्त माणुसकीचे मर्म पाहतो; ज्यांनी सांडले रक्त आपल्या मातृभूमीसाठी, त्यांच्या त्यागामुळेच आज लोकशाहीचा सूर्य तळपतो!
- लिहिली गेली गाथा जिथे समता आणि न्यायाची, ती ओळख आहे माझ्या भारताच्या संविधानाची! प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा आहे अभिमानाचा, नवा संकल्प करूया आज प्रगती आणि ऐक्याचा!
- अनेक रंग, अनेक भाषा, तरीही भारत एक आहे आमची आशा! विश्वगुरु बनण्याचे स्वप्न उराशी, शपथ घेऊया आज भारतमातेच्या चरणापाशी!
