AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Rathore : संजय राठोडांना कोरोनाची लागण; घरीच झाले क्वारंटाईन, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन

 शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईमधील (Mumbai) सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी (Corona Test) केली होती.

Sanjay Rathore : संजय राठोडांना कोरोनाची लागण; घरीच झाले क्वारंटाईन, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन
संजय राठोड
| Updated on: Aug 28, 2022 | 8:45 AM
Share

मुंबई : शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईमधील (Mumbai) सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी (Corona Test) केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणं नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. याबाबत संजय राठोड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.’आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली. व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती’. असं ट्विट संजय राठोड यांनी केलं आहे.

सपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणीचे आवाहन

शनिवारी संजय राठोड यांनी मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी कोली. त्यांच्या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर राठोड हे घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच माझ्या संपर्कात जे आले आहेत, त्यांनी काळजी घ्या, कोरोना चाचणी करून घ्या असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.  ‘आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली. व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती’.  असं ट्विट संजय राठोड यांनी केलं आहे.

संजय राठोड यांचं मंत्रिपद चर्चेत

महाविकास आघाडीचे सरकार असताना संजय राठोड यांना पुजा चव्हाण प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच शिंदे गटात सामील झालेल्या राठोड यांना मंत्रिपद मिळाले. यावरून विरोधकांकडून सरकारवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे. राठोड यांचे मंत्रिपद चांगलेच चर्चेत आहे. तर दुसरीकडे आपल्याला पोलिसांनी क्लिन चिट दिल्याचा दावा मंत्री संजय राठोड यांच्याकडून करण्यात आला आहे.

Follow Us
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?