AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : मुक्ताईनगरकडे पाठ फिरताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; जयंत पाटलांचा जळगाव दौरा चर्चेत

राष्ट्रवादीच्या (NCP) गोटात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी जयंत पाटील (Jayant Patil) हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जयंत पाटील यांचा दौरा आटोपताच राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Jayant Patil : मुक्ताईनगरकडे पाठ फिरताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; जयंत पाटलांचा जळगाव दौरा चर्चेत
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: Google
| Updated on: Aug 28, 2022 | 8:03 AM
Share

जळगाव : राष्ट्रवादीच्या (NCP) गोटात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी जयंत पाटील (Jayant Patil) हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान  यावेळी जयंत पाटलांनी मुक्ताईनगरला देखील भेट दिली. मात्र जयंत पाटलांच्या भेटीनंतर अवघ्या काही वेळातच राष्ट्रवादीच्या मुक्ताईनगरमधील (Muktainagar)अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा आणि रिगाव येथील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.  जयंत पाटील शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरला देखील भेट दिली. मात्र जयंत पाटलांच्या भेटीनंतर अवघ्या काही वेळातच राष्ट्रवादीच्या सारोळा आणि रिगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला तब्बल 40 दिवस लागले. यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद  न मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता शिंदे गटातीलच नाही तर भाजपमधील देखील काही आमदार नाराज असल्याचे जंयत पाटील यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजप आणि शिंदे गटातील काही  आमदारांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकणार नाही असं सातत्याने विरोधकांकडून सांगण्यात येत आहे.

शिंदे गटात इनकमिंग सुरूच

काल मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. विशेष म्हणजे मुक्ताईनगला काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी भेट दिली होती. पाटलांचा दौरा अटोपताच कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यापूर्वी देखील शिवसेनेतील अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच महाविकास आघाडीमधील आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.