AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखातले 5 स्फोटक मुद्दे

केंद्रीय मंत्री नारायण राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, याबद्दल देवेंद्र फडणवीसांच्या मनातही शंका नाही, असं म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.

नारायण राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखातले 5 स्फोटक मुद्दे
नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 7:57 AM
Share

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई पूर्ण देशाने पाहिली. सेना-राणे यांच्यातला अभूतपूर्व राडाही राज्याने पाहिला. पण या राड्याला राणे आणि भाजप समर्थकांना जबाबदार धरत आजच्या सामना अग्रलेखातून 5 महत्त्वाचे आणि स्फोटक मुद्दे मांडण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेने फडणवीस-चंदक्रांतदादांकडून काही अपेक्षा ठेवल्यात तर राणेंच्या मंत्रिपदाविषयी देखील भाकित केलं आहे. राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, याबद्दल फडणवीसांच्या मनातही शंका नाही, असं म्हणत राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.

कायदा सगळ्यांसाठी सारखा, राणेंवरील कारवाईने सिद्ध झालं

राज्यात इकडे तिकडे थोडे काही झाले की, विरोधी पक्षाची कुंडलिनी जागी होते व राज्यात कायद्याचे राज्य आहे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. यापुढे महाराष्ट्रात विरोधकांकडून हे असले प्रश्न विचारले जाणार नाहीत. भारतीय जनता पक्षाचे ‘पर’आत्मा नारायण राणे यांच्यावर कायद्यानेच कारवाई झाली व माणूस ‘नॉर्मल’ असो वा राणेंसारखा ‘अॅबनॉर्मल,’ कायदा सगळ्यांसाठी सारखाच हे राज्याच्या पोलिसांनी दाखवून दिले. राणे यांची अटकही इतर सामान्य गुन्ह्याप्रमाणे आहे, असं म्हणत राणेंच्या अटकेसाठी मंत्र्यांनी दबाव टाकल्याच्या आरोपांना राऊतांनी अप्रत्यक्ष उत्तर दिलं.

फडणवीस चंद्रकांतदादांकडून आम्हाला ही अपेक्षा नाही

”राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील कारवाई योग्य नाही,” हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक द्या, अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली (फौजदारी) करणाऱ्या फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही.

राणे काय खान अब्दुल गफार खान वाटले काय?

राणे यांना पोलिसांनी पकडल्यावर राज्यात अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट असल्याचे म्हणणे हा राज्याचा अपमान आहे. फडणवीस व इतरांना राणे हे काय खान अब्दुल गफार खान वाटले काय? राणेंच्या अटकेनंतर भाजपवाल्यांना इतक्या मिरच्या झेंबण्याचे कारण नव्हते. भाजपमधील फौजदारी वकिलांनी राणे यांच्या धमकीवजा वक्तव्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. चंद्रकांत पाटलांकडून ती अपेक्षा नाही.

राणे मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’, फडणवीसांच्याही मनात शंका नसेल

आजच्या अग्रलेखात सगळ्यात स्फोटक आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामनातून राणेंच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळावर भाष्य करण्यात आलंय. राणे मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत, याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी, असं म्हणत राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.

“मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात व जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे ‘महान’ हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी”, असं अग्रलेखात म्हटलंय.

तर याचा तपास ठाकरे सरकारने करायला हवा

राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि अटक केली असं त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरुन उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरुन, भरसंसारातून कायमचं कुणी उठवलं याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा, अशी मागणी करुन राणेंसमोरच्या अडचणी वाढण्याचे संकेतच जणू राऊतांनी दिलेत.

परवाच्या राड्याला सर्वस्वी राणे आणि तळी उचलून धरणारे भाजप कार्यकर्ते जबाबदार

राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते, असं म्हणत या राड्याला सर्वस्वी राणे आणि भाजपमधील लोकांना राऊतांनी जबाबदार धरलं आहे. तसंच शिवसेना-भाजपमध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते, असंही सांगायला राऊत विसरले नाही.

(Sanjay Raut Attacked Union Minister narayan Rane Maharashtra BJP Through 5 points Saamana Editorial)

हे ही वाचा :

राणेंनी स्वतःला महान समजणं बंद केलं तरी त्यांच्या आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील, सामनातून राणेंवर पुन्हा हल्लाबोल

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.