महाराष्ट्रात जादुटोणा? ‘हे’ प्रताप राज्यातल्या करणी टोळीचे? सामनातून परखड सवाल, देवेंद्र फडणवीस यांना काय साकडं?

महाराष्ट्रात कुणी जादुटोणा करतंय, अशी लोकांची भावना असणे हीच पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट असल्याचं मत संपादकीयात मांडण्यात आलंय...

महाराष्ट्रात जादुटोणा? 'हे' प्रताप राज्यातल्या करणी टोळीचे? सामनातून परखड सवाल, देवेंद्र फडणवीस यांना काय साकडं?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 10:21 AM

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने काल पुण्यातील एका कार्यक्रमात पेट घेतला. तकर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील एका विचित्र अपघातातून बचावले. चौथ्या मजल्यावर पोहोचण्याआधी लिफ्ट धाडकन् खाली कोसळली… गेल्या काही दिवसात आमदार, खासदारांचे होत असलेले भयंकर अपघात, यामागे काही करणी वगैरे केली आहे की काय, असा सवाल लोकांच्या मनात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कुणी जादुटोणा करतंय, अशी लोकांची भावना असणे हीच पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट असल्याचं मत संपादकीयात मांडण्यात आलंय…

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अघोरी विषयांच्या चर्चांना वेळीच रोखण्यासाठी तसेच विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे, यासाठी पांडुरंगास साकडे घालावे, अशी मागणीही सामनातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात जादूटोण्याची चर्चा…

गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे महाराष्ट्रात जादूटोण्याची चर्चा घडतेय, हे सामनातून निदर्शनास आणून देण्यात आलंय. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा कायदा केला, पण मिंधे-फ़णवीसांचे सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे. मंत्रालयात तसेच इतर सरकारी कार्यालयात अशीच चर्चा असल्याचं सामनातून म्हटलंय..

शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार गुवाहटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे म्हटले जाते. मुख्यमंत्री पदाच्या स्थैर्यासाठी हे बळी दिल्याचं सांगण्यात आलं.. पुन्हा त्याच मंदिरात जाऊन नवस फेडला गेला.. हे सरकार आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात, घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक जादूटोण्याची जोडत असतील तर ते बरे नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलंय.

सुप्रिया सुळे, अजित पवारांबाबत काल घडलेली गटना, विरोधकांचा बुलंद आवाज धनंजय मुंडे यांच्या गाडीचा भीषण अपघात, संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले, मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांना अखेरच्या काळात भयंकर आजाराला सामोरे जावे लागले.. तेव्हापासूनच सरकार पाडण्याचे प्रयोग सुरु झाले.

म्हणजे महाराष्ट्रातील करणी टोळीचे हे अघोरी प्रयोग आधीपासूनच सुरु होते, या अघोरी प्रयोगांचे फटके महाराष्ट्राच्या जनमानसाला बसत आहेत.. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे, अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.