मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीनं ताब्यात घेतलं आहे. रविवारी सकाळीच ईडीचं पथक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी दाखल झालं. तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी राऊत यांना कार्यालयात घेऊन आले. संजय राऊतांवरील कारवाईनंतर विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर ईडीकडे काही कागदपत्रे आहेत, त्यात वर्षा संजय राऊत (Varsha Sanjay Raut) यांचा उल्लेख असल्याचीही माहिती मिळतेय.