Sanjay Raut : तुरुंगात जाण्यापूर्वी भावाला कडकडून मिठी मारली, आईची विचारपूस केली, राऊत म्हणाले, तुम्ही कणखर राहा, विजय आपलाच होईल!

| Updated on: Aug 09, 2022 | 10:05 AM

Sanjay Raut : संजय राऊत यांची आज ईडी कोठडी संपली. त्यामुळे त्यांना कोर्टात आणण्यात आलं होतं. राऊत यांना कोर्टात आणल्यानंतर अवघ्या काही वेळातच 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे.

Sanjay Raut : तुरुंगात जाण्यापूर्वी भावाला कडकडून मिठी मारली, आईची विचारपूस केली, राऊत म्हणाले, तुम्ही कणखर राहा, विजय आपलाच होईल!
राऊत म्हणाले, तुम्ही कणखर राहा, विजय आपलाच होईल!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांना आता 14 दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. आज राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत उपस्थित होते. कोर्टाने कोठडी सुनावल्यानंतर संजय राऊत बाहेर पडले. तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी भाऊ संदीप राऊत यांना आई कशी आहे? अशी विचारणा करत आईची चौकशी केली. त्यानंतर संदीप राऊत यांना कडकडून मिठी मारली. तुम्ही कणखर राहा. मनाशी गाठ बांधा विजय आपलाच होईल, असं राऊत म्हणाले. त्यावेळी दोघांनाही गहिवरून आले होते. त्यानंतर राऊत जीपमध्ये बसले आणि तुरुंगाच्या दिशेने गेले. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (patra chawl scam) राऊत यांना अटक करण्यात आली आहे.

संजय राऊत यांची आज ईडी कोठडी संपली. त्यामुळे त्यांना कोर्टात आणण्यात आलं होतं. राऊत यांना कोर्टात आणल्यानंतर अवघ्या काही वेळातच 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. यावेळी राऊत यांचे भाऊ संदीप राऊत आणि सुनील राऊतही उपस्थित होते. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर राऊत बाहेर आले. त्यावेळी त्यांचे भाऊ संदीप राऊत यांनी त्यांची भेट घेतली. संदीप राऊत येताच राऊत यांनी त्यांना आई कशी आहे? आईची तब्येत बरी आहे ना? असा सवाल केला. त्यानंतर संदीप राऊत यांच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून त्यांना कडकडून मिठी मारली. अन् तुम्ही कणखर राहा. मनाशी गाठ बांधा, विजय आपलाच होईल, असं सांगितलं. संदीप राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

आम्ही मजबूतीने लढू

संजय राऊत यांनी आईची विचारपूस केली. त्यानंतर ते जीपमध्ये बसून निघून गेले. आम्ही परवा वकिलांशी बोलणार आहोत. त्यानंतर जामिनासाठी अर्ज करणार आहोत. हा लढा आहे. जर जिंकलो तर इतिहासात नोंद होईल. आम्ही मजबूतीने लढू आणि काम करू. शेवटपर्यंत शिवसेना ही संजय राऊतांसेबत आणि ते शिवसेनेसोबतच राहतील, असं संदीप राऊत यांनी सांगितलं.

आर्थर रोड तुरुंगात मुक्काम

दरम्यान, संजय राऊत यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. राऊत यांना घरचं जेवण देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांना औषधेही देण्याची परवानगी देण्यात आली आहे.