AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: अनेक आंडू पांडू बंडू आले अन्… संजय राऊत यांचा थेट हल्ला! संजय जाधवांच्या द बॉसची चिरफाड

Sanjay Raut: सध्या उद्धव ठाकरे हे बंडखोर खासदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्यासोबत या दौऱ्यावर खासदार संजय राऊत देखील असल्याचे दिसत आहे. परभणीमध्ये संजय राऊत यांनी बंडखोर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut: अनेक आंडू पांडू बंडू आले अन्... संजय राऊत यांचा थेट हल्ला! संजय जाधवांच्या द बॉसची चिरफाड
Sanjay RautImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 28, 2026 | 12:44 PM
Share

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता ठाकरेंनी त्या बंडखोर खासदारांच्या मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. त्यांनी प्रत्येक मतदार संघात जाऊन शिवसैनिकांची भेट घेतली. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत देखील आहेत. त्यांनी परभणी येथील शिवसैनिकांना संबोधीत केले. दरम्यान त्यांनी बंडखोर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

परभणीत संजय राऊतांनी संजय जाधवांवर टीका केली आहे. ते म्हणाले, “जगात जर्मनी आणि देशात परभणी का म्हणतात ते काल कळलं. उद्धव ठाकरे यांचं परभणीच्या वेशीवर आगमन होताच शिवसैनिकांनी गद्दारांचा निषेध केला. एल्गार केला. या परभणीत गद्दार टिकला नाही. त्यामुळे जगात फक्त परभणीच त्या मुंडक्याचं काय करायचं ते पाहू. ते मुंडकं राहत नाही. या परभणीत अनेक आंडू पांडू बंडू आले आणि गेले. शिवसेना मजबूतीने उभी आहे. आणि ती राहणार. हा स्वत:ला काय म्हणतो बंडू द बॉस. अरे गांडू द बॉस. बरोबर ना. या पुढे त्याला गांडू द बॉस म्हणायचं आहे.”

पुढे ते म्हणाले, “ही परभणी आहे. त्याला सांगा. तो कोणत्या बिळात बसला ते बघून घ्या. विकासाच्या गोष्टी करतो. दोन वेळा आमदार, तीन वेळा खासदार. २० वर्ष हा माणूस सत्तेत आहे. या २० वर्षात त्याने पिठाची गिरणी आणली नाही, तो काय विकास करणार. साधी पिठाची गिरण आणली नाही, तो विकास करणार. तो भाजपला आणि मोदींना १२ वर्ष विकास सापडला नाही. तुम्हाला काय सापडणार?”

‘बंडू गांडू येतील आणि जातील’

राममंदिराच्या चोरीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “रामाच्या मंदिराची लूट चालू आहे. हे यांचं हिंदुत्व आणि त्यांच्या पक्षात हे गांडू द बॉस बूट चाटायला गेले आहेत. या परभणीत कोणीही गद्दारी केली तरी गद्दारीला गाडण्याचं काम परभणी केलं आहे. परभणीची हा काय दुबई करणार आहे का. हा काय परभणीचं सिंगापूर, स्वित्झर्लंड करणार आहे का. पत्र्याच्या घरात राहणारा हा शिवसैनिक कुठे राहतो. तो दोन हजार कोटींचा मालक आहे, असं कुणी तरी सांगितलं. तो म्हणतो चापटी मारून दाखवा. अरे चापटी काय तुला तुडवणार आहे. ऑपरेशन तुडवा हे त्याचसाठी आहे. गद्दार दिसला की तुडवा. त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही. हा शिवसेनाप्रमुखांचा आदेश आहे. बंडू सारख्या गांडूने आम्हाला आव्हान देऊ नये. परभणी शिवसेनेचीच राहील. बंडू गांडू येतील आणि जातील. चिंता करायचं कारण नाही.”

शेवटी संजय राऊत म्हणाले, काल मला वाटलं आपल्या आमदाराची मिरवणूक चालली आहे. पण नंतर कळलं त्या गांडूच्या मयताला चाललो आहोत. या भागातील चार आमदार तुम्ही निवडून द्या. ही जबाबदारी घेतली तर २०२९ला आपले १०० आमदार निवडून येतील आणि स्वतच्या ताकदीवर आपली सत्ता येईल. तेव्हा विकास काय असतो हे गांडूला दाखवून देऊ

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं