AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेमंत्री आले, आता जो बायडन यांना प्रचाराला आणा, आम्ही तुम्हाला घाबरत नाही: संजय राऊत

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आलीय. यानिमित्तानं शिवसेना खासदार संजय राऊत आज दादरा नगर हवेलीत आहेत.

रेल्वेमंत्री आले, आता जो बायडन यांना प्रचाराला आणा, आम्ही तुम्हाला घाबरत नाही: संजय राऊत
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 1:19 PM
Share

सिल्वासा: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आलीय. यानिमित्तानं शिवसेना खासदार संजय राऊत आज दादरा नगर हवेलीत आहेत. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला.रेल्वेमंत्री प्रचाराला येत आहेत, इतर मंत्रीही येतील, हवं तर जो बायडन यांना प्रचाराला आणा शिवसेना घाबरत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

प्रशासन लोकांना गुलामासारखं वागवतंय

मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्मबलिदान दिलं. येथील व्यवस्थेनं मोहनभाई यांच्या सारख्या तेज तर्रार नेत्याचा जीव घेतला. अभिनव यांना पाहिल्यावर मोहन डेलकर यांची आठवण येते, असं संजय राऊत म्हणाले सिल्वासा आणि दादरा नगर हवेली कित्येक वर्षानंनतर स्वतंत्र झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना मी येथील प्रशासन कसं काम करतंय हे पाहण्यासाठी बोलवतोय. येथील लोकांना गुलांमासारखं वागवलं जातंय. लोक या सत्ताधीशांपेक्षा पोर्तुगीज बरे असं म्हणायला लागले आहेत. शिवसेना येथील लोकांच्या पाठिशी उभं राहणार आहे. मोहन डेलकर यांना न्याय मिळावा म्हणून दादरा नगर हवेलीतील पोटनिवडणुकीत उमदेवार दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

रेल्वेमंत्री प्रचाराला आले, इतर ही येतील, जो बायडनला पण बोलवा

दादरा नगर हवेलीतील प्रशासनाची दहशत मोडून काढण्यासाठी शिवसेना साथ देईल. इथल्या दहशतीला संपवून जाणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. इथल्या जनतेच्या विकासासाठी शिवसेना त्यांच्या पाठिशी उभे राहिलं, असं संजय राऊत म्हणाले. देशात सध्या केंद्रातील मंत्र्यांना कोणतंही काम राहिलेलं नाही. त्यामुळं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत रेल्वे मंत्री तळ ठोकून बसले आहेत. रेल्वे विकून टाकली त्यामुळं रेल्वेमंत्री दादरा नगर हवेलीत आले आहेत. इथं इतरही मंत्री येतील. बंगालमध्येही गेले होते. तिथं त्यांचं काय झालं. भाजपनं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जो बायडन यांना आणावं असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सेनेच्या राष्ट्रीय राजकारणाची सिल्वासामधून सुरुवात

सिल्वासाच्या विकासाचे मुद्दे 20 वर्षांपासून प्रलंबित आहेत. मोहन डेलकर इथं 7 वेळा निवडून आले. त्यांचा दोन वेळा कसा पराभव करण्यात आला हे सर्वांना माहिती आहे. शिवसेना स्वाभिमानाचं दुसरं नाव आहे. शिवसेना लाचार होत नाही इतरांना लाचार बनवते, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना 2024 मध्ये राष्ट्रीय पातळीवर उतरेल त्याची सुरुवात सिल्वासामधून होईल.

इतर बातम्या:

मोहन डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन! पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारीची घोषणा

मोहन डेलकरांचे कुटुंबीय हाती शिवबंधन बांधणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिवसेना प्रवेश

Sanjay Raut slam BJP and gave challenge to party should be bring Joe Biden for DNH by election campaign

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.