AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतेज पाटील यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळण्याची शक्यता, ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसचे किती मंत्री?

कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (Congress Satej Patil) यांना मंत्रिमंडळात बढती (Thackeray Govt reshuffle ) मिळण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्याकडे सध्या गृहराज्य मंत्रिपद (Minister of State Home) आहे.

सतेज पाटील यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळण्याची शक्यता, ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसचे किती मंत्री?
सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 3:11 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (Congress Satej Patil) यांना मंत्रिमंडळात बढती (Thackeray Govt reshuffle ) मिळण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्याकडे सध्या गृहराज्य मंत्रिपद (Minister of State Home) आहे. मात्र त्यांना आता काँग्रेसकडून कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली जाऊ शकते. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi cabinet reshuffle) मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर, इकडे राज्यातही हालचाली सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या पदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे. याचवेळी मंत्रिमंडळ विस्तार होऊन सतेज पाटील यांना कॅबिनेट मंत्री केलं जाऊ शकतं. (Congress leader and Minister of State Home Satej Patil may get promotion in Uddhav Thackeray cabinet reshuffle Maharashtra sarkar)

सध्या काँग्रेसच्या वाट्यात असलेल्या मंत्रिपदांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात केवळ एक मंत्रिपद दिलं आहे. नगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री आहेत. मात्र नगर जरी पश्चिम महाराष्ट्रात येत असलं तरी त्याचं महसुली क्षेत्र नाशिक विभागात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने कॅबिनेट मंत्रिपदच दिलेलं नाही.

पश्चिम महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात वगळता दुसरा कॅबिनेट मंत्री नसल्यानं सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सतेज पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष निवड, गोकुळ निवडणुकीत मिळविलेल्या यशाचे पालकमंत्री सतेज पाटील यांना बक्षीस देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार डिसेंबर 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली होती. त्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत  तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.

ठाकरे सरकारमधील काँग्रेसचे मंत्री

बाळासाहेब थोरात – महसूल मंत्री नितीन राऊत – ऊर्जा मंत्री अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री भोकर (नांदेड) के सी पाडवी – आदिवासी मंत्री – अक्कलकुवा (नंदुरबार) विजय वडेट्टीवार – मदत आणि पुनर्वसन मंत्री – ब्रह्मपुरी (चंद्रपूर) अमित देशमुख– वैद्यकीय शिक्षण मंत्री – लातूर शहर (लातूर) सुनिल केदार – क्रीडा मंत्री, सावनेर (नागपूर) यशोमती ठाकूर – महिला आणि बालकल्याण मंत्री- तिवसा (अमरावती) वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण मंत्री – धारावी (मुंबई) अस्लम शेख – वस्त्रोद्योग, बंदर विकास, मत्स्यपालन मंत्री मालाड पश्चिम (मुंबई) सतेज पाटील (राज्यमंत्री) – गृहराज्य मंत्री – कोल्हापूर (विधानपरिषद) डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – सहकार राज्यमंत्री पलुस कडेगाव (सांगली)

संबंधित बातम्या  

ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार – राष्ट्रवादीचे 14, शिवसेनेचे 12, तर काँग्रेसचे 10 मंत्री, पाहा संपूर्ण यादी

काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?

राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.