फडणवीसांचा ‘सागर’ बंगला आणि बीकेसी पोलीस ठाण्याला छावणीचं स्वरुप; प्रसाद लाड यांचं आवाहन काय?

फोन टॅपिंगप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या नोटिशीची होळी करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

फडणवीसांचा 'सागर' बंगला आणि बीकेसी पोलीस ठाण्याला छावणीचं स्वरुप; प्रसाद लाड यांचं आवाहन काय?
फडणवीसांचा 'सागर' बंगला आणि बीकेसी पोलीस ठाण्याला छावणीचं स्वरुपImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 11:12 AM

गिरीश गायकवाड, मुंबई: फोन टॅपिंगप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजप (bjp) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या नोटिशीची होळी करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरही भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता असल्याने बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलीस हे फडणवीस यांच्या सागर बंगल्यात जाऊन त्यांची चौकशी करणार असल्याने सागर बंगल्याबाहेरही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांना आलेल्या नोटिशीची होळी करण्यास सुरुवात केली आहे. तर, पोलीसच फडणवीसांच्या घरी घेणार असल्याने कुणीही सागर बंगल्याबाहेर गर्दी करू नये, असं आवाहन भाजपचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी केलं आहे.

भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्याला छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलीस बदली घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे बीकेसी पोलीस स्टेशनबाहेर शक्तीप्रदर्शन करण्याची भाजपने तयारी सुरू केली होती. त्यामुळे ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे. मात्र, गृह खात्याने फडणवीसांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजप कार्यकर्ते जमण्याची शक्यता बळावली होती. सागर बंगल्याबाहेर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी बॅनबाजी केली आहे. देवेंद्रजी, आप संघर्ष करो, हम आपके साथ है, अशी बॅनरबाजी केल्याने भाजप कार्यकर्ते सागरबाहेर एकवटणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं होतं. त्यामुळे सागर बंगल्याबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आल्या असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करूनच आत सोडले जात आहे.

सागर बाहेर जमू नका

आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदविण्यासाठी आज मुंबई पोलीस सागर बंगल्यावर जाणार आहेत. त्यांना आमचं सहकार्य असणार आहे. पोलिसांनी फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. फडणवीस येणार म्हटल्यावर वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर हजारो भाजप कार्यकर्ते जमले असते. त्यामुळे गृहखात्याने चांगला निर्णय घेतला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन करत आहोत की कार्यकर्त्यांनी बंगल्या बाहेर जमू नये. मी सुद्धा सागर बंगल्यावर जाणार आहे, असं भाजप आमदार लाड म्हणाले.

थोडा विचार करून बोला

आम्ही मलिक यांचा राजीनामा मागत आहोत. नवाब मलिक यांचा थेट संबंध दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांशी आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा मागण्यासाठी हा मोर्चा काढलेला होता. परंतु त्यांचा राजीनामा शरद पवार हे मंजूर करत नाहीत, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना पवारांबाबत बोलताना विचार करण्याचा सल्ला दिला. अशी वक्तव्य करत असताना थोडा विचार सुद्धा केला पाहिजे. पण FIR सूडबुद्धीने नोंदवला गेला आहे. संपूर्ण भाजप पक्ष नितेश राणे यांच्यासोबत ताकदीने उभा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर शिवसेनेने खुलासा करावा

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांचे नातेवाईक जर शिवसेनेच्या कार्यक्रमात येत असेल तर त्या संदर्भात खुलासा शिवसेनेने केला पाहिजे. तो नातेवाईक जर शिवसेनेचा सदस्य असेल तर त्याची सदस्यता तात्काळ रद्द केली पाहिजे. कोणत्याही पक्षाचा जर दाऊद इब्राहिम यांच्या नातेवाईकांशी संबंध असेल तर त्यांनी या सगळ्या संदर्भात खुलासा हा केलाच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

राणे बंधुच्या विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल, शरद पवारांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवणार

लातुरात अमलदाराची गोळी झाडून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्टच

देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस, अनिल बोंडे यांनी सांगितले यामागील कारण, आता जेलमध्ये जाण्यासाठी कुणाचा नंबर?

एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....