सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा, मानहानीच्या दाव्यावरुन संजय राऊतांचं उत्तर

संजय राऊत म्हणाले, "गोष्ट असते ती आत्मसन्मानाची. त्यामुळे किंमत काही असो. तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात"

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा, मानहानीच्या दाव्यावरुन संजय राऊतांचं उत्तर
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 11:25 AM

मुंबई : “आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असो तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात”, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याची देशभर चर्चा सुरु होती.

त्याबाबत आज पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “गोष्ट असते ती आत्मसन्मानाची. त्यामुळे किंमत काही असो. तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात”

गुजरातमध्ये सापडलेल्या 21 हजार कोटींच्या ड्रग्सवरुनही संजय राऊतांनी निशाणा साधला. 21 हजार कोटींचं ड्रग्स कुठे पकडतात आणि कुठे जातात हे सगळं आम्हाला माहीत आहे, त्यामुळे सगळं आम्ही योग्य वेळेत काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

रश्मी ठाकरे यांना शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. रश्मी ठाकरे या आमच्या वहिनी आहेत, त्यांच्यासोबत आमच्या शुभेच्छा या नेहमी असतीलच, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे आणि अमित शाह बैठक

प्रत्येक बैठकीत राजकारणाविषयी चर्चा होईल असं काही नसतं. महाराष्ट्रात नक्षलग्रस्त जिल्हे विदर्भात आहेत. त्यांसंदर्भा ही बैठक आहे. मुख्यमंमत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला हजर राहणार आहेत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

सव्वा रुपयाच्या दाव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा चिमटा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.  राजकारणात एकमेकांवर बोलावं लागतं. आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत. चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. मीही चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, असंही ते म्हणाले.

VIDEO : संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांची ‘सव्वा रुपयां’ची लढाई

संबंधित बातम्या 

चंद्रकांत पाटलांचे आरोप दळभद्री, चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा करणार: संजय राऊत

Chandrakant Patil Live | संजय राऊतांनी सव्वा रुपयांच्या दाव्याची किंमत वाढवावी:चंद्रकांत पाटील

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.