Sharad Pawar : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा सांगावा की सांगू नये?; शरद पवारांनी टोचले एकनाथ शिंदे यांचे कान

Sharad Pawar : सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही. पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा सांगावा की सांगू नये?; शरद पवारांनी टोचले एकनाथ शिंदे यांचे कान
शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा सांगाव की सांगू नये?; शरद पवारांनी टोचले एकनाथ शिंदे यांचे कानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 11:10 AM

बारामती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच ओरिजीनल शिवसेना (shivsena) असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा केला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे यांचे कान टोचले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काय केलं होतं, याचं उदाहरणही दिलं आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे (eknath shinde)  यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला. वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्हं आम्ही मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वढवणे योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी बारामतीत मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सल्ला दिला.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील, राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी श्रीलंकेतील परिस्थितीवर भाष्य केलं. श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झालं. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षातली आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे ती पाकिस्तानमध्ये देखील उद्भवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषत: मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही. पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हर घर तिरंगा पक्षीय कार्यक्रम नाही

यावेळी त्यांनी हर घर तिरंगा या कार्यक्रमावर भाष्य केलं. राष्ट्रीय कमिटी आहे. त्याचा मी सदस्य आहे. त्यात हर घर तिरंगा मोहिमेची चर्चा झाली. हा पक्षीय कार्यक्रम नाही. यात आम्हा सगळयांची त्यांना साथ आहे, असं पवारांनी सांगितलं.

सरकारला आस्था नाही

संसद चालवण्याची आस्था केंद्र सरकारला आहे, असं गेल्या काही वर्षातून वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला. केंद्राकडून चर्चेचे मार्ग बंद केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

पवारांनी बोलणे टाळले

शिंदे सरकारमध्ये संजय राठोड यांचा समावेश करण्यात आला. तसेच मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आला नाही. त्याबाबत पवारांना विचारण्यात आले. त्यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले. मी त्यावर बोलणार नाही, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.