संजय राऊतांनी तसं बोलायला नको होतं : शरद पवार

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्पष्टीकरण (Sharad pawar comment on Sanjay Raut)  दिलं.

संजय राऊतांनी तसं बोलायला नको होतं : शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 6:16 PM

नाशिक : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्पष्टीकरण (Sharad pawar comment on Sanjay Raut)  दिलं. “खासदार आणि शिवेसना नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यापासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. मात्र इंदिरा गांधींबद्दल त्यांनी बोलायला नको होतं,” असे शरद पवार म्हणाले.

“संजय राऊत यांच्या वक्तव्यापासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. मात्र इंदिरा गांधींबद्दल त्यांनी बोलायला नको होतं, हे आमचं मतं आहे. त्यांनी ते मागे घेतलं आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

“सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. ते सर्वच काही माहिती नसतात. महमद अली रोडवरील माझ्या एका सभेत हाजी मस्तान होता. असं वादळ उठलं होतं. मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नाही,” असेही पवारांनी स्पष्ट केलं.

“भाजप आणि मनसेला एकत्र यावं असं वाटतं असेल तर त्यांनी एकत्र यावं,” असेही शरद पवार म्हणाले. जे राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. त्याबाबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केले.

“विधानसभा निवडणूक प्रचार सुरुवात मी नाशकात केली होती. बदल व्हावा ही युवकांची भूमिका होती. त्याचा आम्हाला फायदा झाला. तीन पक्षांचं सरकार करताना आम्ही काही निर्णय घेतले आहे. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण, शेती पुनर्बांधणी धोरण ठरवलं आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

“या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली. 2 लाखाच्या आत 85 टक्के शेतकरी येतात. सध्या याच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्यानंतर येत्या अंदाजपत्रकात उरलेल्या 15 टक्के शेतकऱ्यांचा विचार केला जाईल,” असेही शरद पवार (Sharad pawar comment on Sanjay Raut) म्हणाले.

“अस्वस्थता निर्माण करणारं वक्तव्य करू नये अशी सूचना करणार नाही. सर्व शहाणे आहेत. सरकार 5 वर्ष चालवायचं आहे. काँग्रेस व्यवहारी आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

“ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यासाठी चर्चा सुरू आहे. दिलासा कसा देता येईल हा प्रयत्न सुरु आहे. केंद्रानं अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी.” असेही शरद पवार  म्हणाले.

“बेळगावात मलाही पोलिसांनी मारहाण केली होती. बेळगावातील मराठी लोकांच्या मी पाठीशी आहे. चीन सरकार प्रतिनिधी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी एकत्रित बैठक करून दिली. द्राक्ष चायनाला पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कांदासाठा धोरण आणि निर्यातबंदी रद्द करावी याकरिता मी दिल्लीत पियुष गोयल यांना भेटणार आहे,” असेही शरद पवार (Sharad pawar comment on Sanjay Raut)  म्हणाले.

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.