AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…जेव्हा शरद पवारांमधील आजोबा व्यक्त होतात!

कार्यकर्त्यांच्या हातातील झेंडा कुठलीही समज नसलेल्या गार्गीने हातात घेतला आणि शेताच्या बांधावर फडकवितांना तिचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

...जेव्हा शरद पवारांमधील आजोबा व्यक्त होतात!
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Dec 26, 2019 | 7:27 PM
Share

नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच. याचा अनुभव नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्राला आला. विरोधी पक्षांनी अनपेक्षितपणे मांडलेल्या मुसंडीचे श्रेय अर्थातच  ‘राजकारणातील चाणक्य’, ’80 वर्षाचा तरुण’ असे एक ना अनेक बिरुदे लागलेल्या शरद पवारांना गेले. या ‘तरुणाला’ भेटण्यासाठी गैरराजकीय मंडळींना देखील भारी हौस असते. तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत भला मोठा चहाता वर्ग असलेल्या या यादीत जेव्हा अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश झाला, तेव्हा चक्क सिल्व्हर ओक वरुन तिला आमंत्रण मिळाले आणि गार्गी थेट पवारांना जाऊन भेटली. तेव्हा एरवी चाणक्य वैगरे म्हणवल्या जाणाऱ्या पवारांमधील हळवे आजोबा उपस्थितांच्या नजरेतून सुटू शकले नाही.

गार्गी ही प्रियांका आणि सागर आहेर या दाम्पत्याची मुलगी. एका निवडणूकीत प्रचाराचे वारे वाहत असताना असेच काही राष्ट्रवादीचे प्रचारक आहेर यांच्या घरी आले. कार्यकर्त्यांच्या हातातील झेंडा कुठलीही समज नसलेल्या गार्गीने हातात घेतला आणि शेताच्या बांधावर फडकवितांना तिचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. संपूर्ण राज्यात शरद पवारांची सर्वात चिमुरडी चाहती म्हणून गोंडस गार्गी सोशल मीडियावर भारी भाव खाऊन गेली. तिचा फोटो बघून पुण्यातील राष्ट्रवादीचे परीक्षित तलोकर यांनी चक्क चांदोरी गाठत गार्गीला भेट दिली. यावेळी शरद पवारांना भेटायचं का म्हणून विचारलं असता इवल्याश्या गार्गीने लगेचच होकार दिला. अर्थात तिला पवारांच्या कर्तृत्वाची जाण नसेलही, पण राज्याच्या राजकारणात सुरुवातीपासून केंद्रबिंदू असलेले शरद पवार गार्गीने अनेकदा घरातल्या टीव्हीवर बघितले आणि चक्क पवार साहेब, पवार साहेब म्हणत भेटण्याचा आग्रह केला.

शरद पवारांची भेट म्हंटल की, अनेकांच्या बकेट लिस्ट मधला हा प्राधान्यक्रम. अशात आपला नंबर कधी म्हणून गार्गीच्या वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु हट्ट सोडतील ती लेकरं कसली? यामुळेच जेव्हा जेव्हा शरद पवार तिला टीव्हीवर दिसत तेव्हा तेव्हा तिचा हट्ट आई-प्रियंका आणि वडील सागर यांना विचार करायला लावायचा.

लेकीचा ह्या हट्टाची सागर आहेर यांनी परीक्षित तलोकर यांना माहिती दिली, त्यांनी हा बालहट्ट सिल्व्हर ओक पर्यंत पोहचवला. यानंतर परीक्षितांच्या माध्यमातून थेट पवारांच्या भेटीचे निमंत्रण गार्गीला मिळाले. लगेचच मुंबई गाठत तिने आपल्या आई-वडिलांसह पवारांना गुलाबपुष्प देत त्यांच्या विषयीचं प्रेम व्यक्त केलं. एरवी राजकीय हेतूने भेटणाऱ्या कार्यकर्त्या व्यतिरिक्त पवारांना भेटणारी ही चिमुकली त्यांच्यासाठी देखील तितकीक खास ठरली. अशात पवारांमधील आजोबांनी देखील मग तिची तितक्याच मायेनं चौकशी करून तिला भारताची एक सक्षम, जबाबदार, निर्भीड नारी होण्यासाठी आशीर्वाद दिले.

When Sharad Pawar met Gargi

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...