मोठी बातमी! शरद पवार यांच्या पक्षाला मोठं भगदाड, बाहुबली नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ!

शरद पवार यांच्या पक्षाचे पुण्याचे नेते प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने त्यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! शरद पवार यांच्या पक्षाला मोठं भगदाड, बाहुबली नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ!
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 24, 2025 | 6:31 PM

Prashant Jagtap : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुका एकत्रच होत आहेत. या सर्व निवडणुकीत पुणे, पिंपरी चिचवड महापालिकांची निवडणूक राज्याच्या केंद्रस्थानी आलेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीमुळे नाराज असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने शरद पवार यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे.

मेलद्वारे सोपवला राजीनामा

प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते शरद पवार यांच्या  पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे सांगितले जात होते. पुणे आणि पंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार आहेत. तशा पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच आता प्रशांत जगताप यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा मेलद्वारे सोपवला आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.

 

प्रशांत जगताप पुणे पालिकेची निवडणूक लढवणार

राजीनाम्याची घोषणा करताना प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच मी राजकारणातून निवृत्त होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशांत जगताप पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर27  वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. तसेच  त्यांनी या 27 वर्षांच्या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.