AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरत्या वर्षांने काय दिलं? येत्या वर्षाकडून कुठल्या आशा? शरद पवारांनी मनमोकळेपणाने सांगितलं…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा आहेत, यावर बोलले आहेत.

सरत्या वर्षांने काय दिलं? येत्या वर्षाकडून कुठल्या आशा? शरद पवारांनी मनमोकळेपणाने सांगितलं...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Dec 31, 2022 | 11:19 AM
Share

बारामती : आज 31 डिसेंबर. 2022 वर्षातील शेवटचा दिवस. 2022 वर्ष संपत आलंय. 2023 च्या (New Year 2023) उंबरठ्यावर आपण आहोत. अशात सरत्या वर्षाने आपल्याला काय दिलं आणि येत्या वर्षात काय करायचं याची गोळाबेरीज करण्याचा हा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देताना अन् नव वर्षाचं स्वागत करताना तुमच्या आमच्याप्रमाणे राजकीय नेतेही यावर भाष्य करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा आहेत, यावर बोलले आहेत. ते बारामतीत बोलत होते.

आजची तारीख 31 डिसेंबर. बरंच काही सांगून जाते… मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या… जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली… आता आपण यातून मुक्त झालो, असं शरद पवार म्हणालेत.

आता 2023 वर्ष सुरु होईल.. 1 तारीख उद्याच आहे. अवघा भारत देश औत्सुक्याने नव्या वर्षाची पाहतोय. येतं वर्ष नव्या आशा-आकांक्षांचं असेल, असं शरद पवार म्हणालेत.

56 ते 60 टक्के लोक शेती करत आहेत. पाऊस चांगला झाला तर येणारं वर्ष चांगलं जाईल. शेती चांगली झाली तर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढणं हे व्यापार उद्योगाला चांगले दिवस आणतं. बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात, असं पवार म्हणालेत.

सुदैवाने मागील वर्ष ठीक गेलं.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत महत्वाचा निर्यातदार होऊ शकतो. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणा व्हायला हव्यात. सत्तेत कोणीही असलं तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावं लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे. येत्या वर्षात त्याला सामोरं जाऊया. नव्या उमेदीने नव्या उत्साहाने नव्या वर्षाचं स्वागत करूयात, असं शरद पवार म्हणालेत.

Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...